एअरटेलचा ग्राहकांना मोठा झटका, ‘ही’ फ्री सेवा बंद

| Updated on: Feb 03, 2020 | 3:18 PM

एअरटेलने आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. एअरटेल आता ग्राहकांना मोफत नेटफ्लिक्सचे सब्सक्रिप्शन देणार (Airtel stop free service) नाही.

एअरटेलचा ग्राहकांना मोठा झटका, ही फ्री सेवा बंद
Follow us on

मुंबई : एअरटेलने आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. एअरटेल आता ग्राहकांना मोफत नेटफ्लिक्सचे सब्सक्रिप्शन देणार (Airtel stop free service) नाही. एअरटेलच्या ब्रॉडबँड आणि काही पोस्टपेड प्लानसोबत मिळाणारी ही सुविधा आता बंद करण्यात येणार आहे. दरम्यान, वोडाफोन आणि ACT फायबरनेटसारख्या कंपन्या आताही या सुविधा (Airtel stop free service) देत आहेत.

एअरटेल नेटफ्लिक्सची सुविधा बंद करणार असल्याची माहिती त्यांनी आपल्या वेबसाईटवरही दिली आहे. रिलायन्स जिओने आपल्या अनेक प्लॅनसह अमेझॉन प्राइम आणि नेटफ्लिक्ससारख्या अॅप्सचे मोफत सब्सक्रिप्शन देण्यास सुरु केले होते. त्यानंतर एअरटेलनेही आपल्या काही पोस्टपेड आणि ब्रॉडबँड प्लानसह तीन महिने नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन ऑफर केले होते. सध्या युजर्सच्या सब्सक्रिप्शनची व्हॅलिडिटी संपल्यावंर कंपनी फ्री सब्सक्रिप्शन बंंद करणार आहे.

एअरटेलच्या बऱ्याच पोस्टपेड आणि ब्रॉडबँड प्लानसह अमेझॉन प्राईम, Zee5 आणि Xstream सारख्या अॅपचे सब्सक्रिप्शन मिळते. जसे की एअरटेलच्या 499 पोस्टपेड प्लॅनमध्ये 75 जीबी डेटा आणि कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. याशिवाय एक वर्षासाठी अमेझॉन प्राईम मेंबरशिप, Zee5 आणि Xstream सारख्या अॅपच्या सब्सक्रिप्शन शिवाय हँडसेट प्रोटेक्शनही मिळते.