मुंबई : गुगलकडून नुकतेच आपल्या प्ले स्टोअरमधून 85 अॅप हटवण्यात आले आहेत. हे अॅप आपल्या फोनमधील माहितीवर नजर ठेवत होते. गुगलने जरी हे अॅप हटवले असले, तरी कुणी फोनमध्ये डाऊनलोड केले असतील, तर तातडीने हे अॅप मोबाईलमधून हटवा. जे 85 अॅप गुगलकडून स्टोअरमधून हटवण्यात आले आहेत, त्यामध्ये व्हायरसही होता. तसेच हे अॅप मोबाईलवर फुल स्क्रीन जाहिरात दाखवून, त्या माध्यमातून आपल्यावर नजर ठेवत होते. तुमच्या फोन अनलॉकिंगवर, तसेच मोबाईलमधील डेटावर नजर ठेवत होते.
हे अॅप आपल्यासाठी धोकादायक ठरु शकतात. आपल्या काही महत्त्वाच्या गोष्टी, खासगी फोटो, व्हिडीओ यासोबतच फाईल्स चोरल्या जाऊन सार्वजनिक लिकही केल्या जाऊ शकतात. यामुळे गुगलने सतर्कता म्हणून हे अॅप प्ले स्टोअरमधून हटवले आहेत.
90 लाख वेळा डाऊनलोडिंग
जपानची सायबर सिक्युरिटीनुसार हे अॅप आतापर्यंत 90 लाख वेळा डाऊनलोड केले आहेत. यामधील एकट्या ‘Easy UniversL Remote’ या अॅपला 50 लाख वेळा डाऊनलोड करण्यात आलं आहे. या 85 अॅपमध्ये सर्वात जास्त डाऊनलोड होणारा हे एकमेव अॅप आहे.
अशा प्रकारे होते नुकसान
एकदा जर तुम्ही हे अॅप फोनमध्ये डाऊनलोड केलं आणि वापरायला सुरुवात केली, तर सुरुवातीला तुम्हाला पूर्ण स्क्रिनवर पॉप-अप जाहिरात दिसते. जोपर्यंत तुम्ही तुमच्या मोबाईलचे बॅक बटण सारखे दाबत नाहीत, तोपर्यंत ही जाहिरात तुम्हाला दिसत राहते. मात्र यावेळी अनेक वेगवेगळ्या लिंक ओपन होतात. जेव्हा तुम्ही हे अॅप वापरायचं बंद करता, तेव्ह सुद्धा बॅकराऊंडला हे अॅप सुरु असतं आणि अर्ध्या अर्ध्या तासाला तुमच्या फोनमध्ये नोटिफिकेशन देत राहतं.
हटवलेल्या अॅपची संपूर्ण लिस्ट