खुशखबर ! लवकरच येणार स्वस्त 5G स्मार्टफोन, मुकेश अंबानी यांची या कंपनीसोबत हातमिळवणी

| Updated on: Feb 27, 2024 | 6:46 PM

भारतील लोकांना लवकरच नवा आणि स्वस्त स्मार्टफोन मिळणार आहे. हा फोन भारतीय बाजारात लवकरच लॉन्च केला जाणार आहे. मुकेश अंबानी यांच्या जिओ कंपनीने यासाठी एका अमेरिकन कंपनीसोबत हातमिळवणी केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना स्वस्तात ५ जी फोन मिळणार आहे.

खुशखबर ! लवकरच येणार स्वस्त 5G स्मार्टफोन, मुकेश अंबानी यांची या कंपनीसोबत हातमिळवणी
Follow us on

5G Smartphone : भारतीयांना लवकरच स्वस्तात ५ जी फोन मिळणार आहे. कारण स्मार्टफोनची चिप बनवणारी कंपनी आता भारतीय बाजारपेठेत उतरणार आहे. ही एक अमेरिकन कंपनी आहे. स्मार्टफोनमध्ये असलेले चिपसेट आता 5G सपोर्टसह दाखल होणार आहेत. Qualcomm ही कंपनी मुकेश अंबानी यांच्या Jio कंपनीसोबत एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.

युजर्सना 5G वर स्विच करता येणार

भारतीय लोकांची गरज पाहता भारतात हा स्वस्त स्मार्ट फोन लॉन्च केला जाणार आहे. याआधी जिओने स्वस्तात फोन लॉन्च केले आहेत. हा फोन $99 मध्ये खरेदी केले जाऊ शकते. हा फोन या वर्षाच्या अखेरीस भारतीय बाजारात दाखल होऊ शकतो.  क्वालकॉम भारतीय बाजारपेठेत प्रवेश करणार आहे. या चिपसेटच्या मदतीने, 2G युजर्सना 5G वर स्विच करण्याचा अधिकार दिला जाईल. याचा अर्थ, त्याच्या मदतीने, तुमच्यासाठी 5G स्मार्टफोनवर स्विच करणे खूप सोपे होईल.

जिओसोबत लॉन्च करणार फोन

अहवालात म्हटले आहे की, ‘क्वॉलकॉम सध्या भारतातील टॉप टेलिकॉम ऑपरेटर जिओसोबत काम करत आहे. हा फोन मूळ उपकरण निर्मात्यांद्वारे लॉन्च केला जाईल. Qualcomm एक्झिक्युटिव्ह सांगतात की, gigabit 5G स्मार्टफोन उपकरणे 5U स्टँडअलोन आर्किटेक्चरला सपोर्ट करतील. तुम्हाला फोनमध्ये कमी किमतीत कस्टमाइज्ड प्रोसेसर मिळणार आहे. एकप्रकारे, असे म्हणता येईल की हा जिओचा सर्वोत्तम फोन ठरणार आहे.

मुकेश अंबानी यांनी केली होती घोषणा

ऑगस्ट 2022 मध्ये, मुकेश अंबानी यांनी 45 व्या सर्वसाधारण सभेत रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वतीने याची घोषणा केली होती. त्यामुळे दोन्ही कंपन्या मिळून ते केवळ भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी हा फोन बनवत असल्याची शक्यता वर्तवली  जात आहे. हा फोन आता बाजारात कधी येणार याकडे लोकांचं लक्ष लागलं आहे. जानेवारी 2024 मध्ये, चिपमेकरने सांगितले होते की ते भारतात 177.27 कोटी रुपयांची गुंतवणूक ते करू शकतात. चेन्नईमध्ये एक डिझाईन सेंटरही उभारले जात आहे.