गुगलची पाळत टाळण्यासाठी या 7 सेटिंग बदला

| Updated on: Jul 25, 2019 | 8:14 PM

इंटरनेट युजर्सच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सध्या टेलिकॉम कंपनींकडून इंटरनेट मोफत आणि कमी दरात मिळत असल्याने अनेकजण इंटरनेटचा वापर करत आहेत. आज प्रत्येकजण आपला अधिक वेळ सोशल वेबसाईट आणि ब्राऊझिंगमध्ये घालवतात.

गुगलची पाळत टाळण्यासाठी या 7 सेटिंग बदला
Follow us on

मुंबई : इंटरनेट युजर्सच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सध्या टेलिकॉम कंपनींकडून इंटरनेट मोफत आणि कमी दरात मिळत असल्याने अनेकजण इंटरनेटचा वापर करत आहेत. आज प्रत्येकजण आपला अधिक वेळ सोशल वेबसाईट आणि ब्राऊझिंगमध्ये घालवतात. पण यामुळे युजर्ससाठी धोका वाढत असल्याचे समोर आलं आहे. तुम्ही इंटरनेटवर अधिक वेळ घालवत असल्यामुळे तुमची प्रत्येक माहिती गुगलला मिळत आहे. गुगलची प्रत्येक युजर्सवर पाळत आहे. गुगलकडून तुमची सर्व माहिती इतर छोट्या-मोठ्या कंपनींना विकली जात असल्याचा आरोपही केला जातो. यामुळे युजर्सला याचा दुष्परिणामही भोगावा लागू शकतो.

सर्वात मोठे सर्च इंजिन म्हणून मोठ्या प्रमाणात गुगलचा वापर केला जातो. आज इंटरनेट गुगल सर्चपासून ते कॅलेंडर, स्मार्ट असिस्टंट, मॅप्स आणि लोकेशन या सर्वांसाठी युजर्स गुगल अॅपचा वापर करतो. त्यामुळे गुगलला युजर्सची सर्व माहिती मिळत आहे. युजर्सला काय खायला आवडते, तो कोणत्या ट्रेन किंवा फ्लाईटने प्रवास करत आहे. तो अधिक वेळ कुठे घालवतो, इंटरनेटवर सर्वाधिक काय सर्च करतो, कोणत्या ठिकाणी फिरायला जातो या सर्व गोष्टींची माहिती गुगलला मिळत आहे.

कॅम्ब्रिज अॅनालिटिका स्कँडलसारखी घटना समोर आल्यानंतर युजर्सलाही डेटा चोरीची भीती वाटत आहे. पण या पासून स्वत:चे सरंक्षण कसे करता येईल याचा सल्ला आम्ही तुम्हाला देणार आहोत. आम्ही तुम्हाला गुगलचा  वापर बंद करण्याचा सल्ला देत नाही. पण काही ट्रिकच्या माध्यमातून आपण गुगल आपल्यावर ठेवत असलेली पाळत रोखू शकतो. यासाठी तुम्हाला काही सेटिंगमध्ये बदल करावा लागणार आहे.

गुगलची पाळत रोखण्यासाठी या ट्रिकचा वापर करा

ईमेल ट्रॅकिंग ब्लॉक करा

सर्वाधिक युजर्स ईमेलचा वापर करतात. काही युजर्सचे तर दोन ते तीन ईमेल अकाऊंट असतात. गुगलची प्रत्येक युजर्सच्या ईमेलवरही पाळत आहे. तुम्ही कोणता मेल ओपन केला किंवा कोणता मेल सर्वाधिक वेळा पाहिला आहे. ही पाळत रोखण्यासाठी तुम्ही जीमेल अकाऊंटच्या सेटिंगमध्ये जाऊन स्क्रोल करा. त्यानंतर एक इमेज दिसेल. त्यामध्ये ‘Ask before displaying external images’ सिलेक्ट करा. आता तुम्हाला फोटो दिसणार नाही. त्यामुळे पिक्सल ट्रॅक केले जाऊ शकत नाही आणि ईमेल ट्रॅकिंगही केली जाऊ शकत नाही.

लोकेशन ट्रॅकिंग बंद का

गुगलला माहित आहे की, तुम्ही कधी केव्हा कुठे गेला आणि तिथे किती वेळ घालवला. आपल्या मोबाईलमधील लोकेशन हिस्ट्रीमुळे ही माहिती गुगलला मिळते. त्यासाठी तुम्ही myaccountgoogle.com वर जावा. त्यानंतर गुगल अकाऊंटमध्ये डेटा आणि पर्सनलायझेशननंतर लोकेशन हिस्ट्रीमध्ये जावा. लोकेशन हिस्ट्रीमध्ये जाऊन Paused करा.

व्हॉईस रेकॉर्डिंग हटवा

गुगल आता फक्त सर्ज इंजिन नाही, तर एक स्मार्ट असिस्टंटही आहे. तुम्ही व्हॉईस कमांड देऊनही गुगल सर्च करु शकता. विशेष म्हणजे तुम्ही गुगलवर काही म्हटले तर गुगल त्याची रेकॉर्डिंग सेव्ह करतो. जर तुम्हाला हे नको असेल तर गुगल माय अकाऊंटवर जाऊन तुम्ही डेटा आणि पर्सनलायझेशनमध्ये जावा. तिथे व्हॉईस अँड ऑडियो अॅक्टिव्हिटीवर क्लिक करा आणि पाऊस करा.

पर्चेस हिस्ट्री डिलीट करा

जर तुम्ही जीमेलचा वापर करत असाल तर गुगल तुमची पर्चेस हिस्ट्री म्हणजे वस्तू खरेदीही ट्रॅक करत आहे. ही हिस्ट्री डिलीट करण्यासाठी गुगल माय अकाऊंटवरील जीमेल कर्न्फमेशनमध्ये जावा. येथे जे काही खरेदी केलेल्या वस्तूंची लिस्ट असेल ती डिलीट करा. यासाठी तुम्ही त्या वस्तूवर क्लिक करा. यानंतर रिमूव्ह पर्चेस करा. हे तुम्हाला प्रत्येकवेळी करावे लागेल.

गुगल सर्च सोडा

तुम्ही गुगुलवर काही सर्च केले, तर गुगल ते शब्द ट्रॅक करतो. शब्द ट्रॅक केल्यानंतर त्या संबधित जाहीरात गुगल तुम्हाला दाखवतो. यासाठी तुम्ही DuckDuckGo सारख्या सर्च इंजिनचा वापर करु शकता. हे सर्ज इंजिन तुम्हाला ट्रॅक करत नाही.

टू फॅक्टर ऑथेन्टिकेशन ऑन करा

सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपले अकाऊटं हॅक करण्यापासून तुम्ही तुमचा बचाव करु शकता. यासाठी टू फॅक्टर ऑथेन्टिकेशन ऑन करावे लागणार. अशा प्रकारे अकाऊंटमध्ये नवीन डिव्हाईसने लॉग-ईन केल्यावर तुमच्या नंबरवर ओटीपी येईल. या ओटीपीशिवाय तुम्हाला लॉग ईन करता येणार नाही. यासाठी गुगल माय अकाऊंट पेजवर जावा. यानंतर सिक्युरिटीमध्ये जावा. येथे टू स्टेप व्हेरिफिकेशन निवडा आणि पुन्हा पासवर्ड डायल करा. आता ऑथेन्टिकेटर सेटअप करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या स्टेप फॉलो करा.

इतर माहिती लपवा

गुगलकडून आपला डेटा विकला जातो. यासाठी तुम्ही तुमचा डेटा लपवू शकता. यासाठी तुम्ही aboutme.google.com वर जावा. येथे तुम्हाला तुमच्याबद्दल दिसत असलेल्या वेगवेगळ्या माहितीवर आणि सेटिंगने ‘Hidden from other users सिलेक्ट करा.