ICICI च्या ग्राहकांनो सावधान, काही मिनिटात तुम्ही लुटले जाऊ शकता

| Updated on: Jul 05, 2019 | 4:26 PM

मुंबई : आयसीआयसीआय बँकेन आपल्या ग्राहकांना अलर्ट राहण्याची सूचना दिली आहे. जर तुम्ही या अलर्टवर लक्ष दिलं नाही , तर तुमचं अकाऊंटही रिकामं होऊ शकते. बँकेतर्फे सध्या आपल्या ग्राहकांना ईमेल आणि एसएमएसद्वारे अलर्ट करण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यात ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. हॅकर्स अकाऊंट हॅक करत नसून, ते नव्या पद्धतीचा वापर करत […]

ICICI च्या ग्राहकांनो सावधान, काही मिनिटात तुम्ही लुटले जाऊ शकता
का कापली जातात कोपऱ्यातून सिम कार्ड? जाणून घ्या यामागची कारणे
Follow us on

मुंबई : आयसीआयसीआय बँकेन आपल्या ग्राहकांना अलर्ट राहण्याची सूचना दिली आहे. जर तुम्ही या अलर्टवर लक्ष दिलं नाही , तर तुमचं अकाऊंटही रिकामं होऊ शकते. बँकेतर्फे सध्या आपल्या ग्राहकांना ईमेल आणि एसएमएसद्वारे अलर्ट करण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यात ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. हॅकर्स अकाऊंट हॅक करत नसून, ते नव्या पद्धतीचा वापर करत असल्याची माहिती बँकेच्या आयटी विभागाने दिली आहे. सिम स्वॅपिंगच्या माध्यमातून हॅकर्स तुमच्या बँक खात्यावर डल्ला मारत आहे. यासाठी आयसीआयसीआय बँकेने ग्राहकांना सुरक्षित राहण्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत.

सिम स्वॅपिंग म्हणजे काय ?

सिम कार्डमध्ये ग्राहकाचा डाटा असतो. सिम कार्ड ग्राहकांच्या ऑथेंटिकेशनसाठी वापरले जाते. यामुळे तुम्ही सिम कार्डशिवाय दुसऱ्या नेटवर्कला जोडू शकत नाही.  सिम स्वॅपिंग फसवणुकीत सिमचा वापर होतो. अचानक तुमचे सिम कार्ड बंद होते. तुमच्या नावावर जे पण सिमकार्ड आहे, ते सिम हॅकर स्वॅप करतो. यानंतर स्वॅप केलेल्या सिम कार्डला क्लोन करण्यासाठी त्याचे डुप्लिकेट कार्ड बनवले जाते आणि तुम्ही वापरत असलेला नंबरचं सिम कार्ड हॅक करुन हॅकर ते आपल्या नावावर करतो. यामुळे हॅकर आपल्या सर्व बँक अकाऊंटमधून OTP जनरेट करुन त्याचा चुकीचा वापर करतो. यासोबतच OTP च्या मदतीने अकाऊंटमधील पैसे काही मिनीटात काढले जाऊ शकतात.

कशा प्रकारे होते फसवणूक?

फसवणुकीचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे सिम स्वॅप आहे. एका कॉलच्या मदतीने ही फसवणूक केली जाते. तुमच्या नंबरवर एक फोन येतो, टेलिकॉम कंपनीचा एक्झ्युक्युटिव्ह असल्याचे सांगून हॅकर तुम्हाला कॉल करतो. या कॉलमध्ये तुम्हाला नेटवर्क आणखी चांगले करण्यासाठी फोन नंबरची सत्यता पडताळण्यास सांगितले जाते. कॉलर तुम्हाला नेटवर्क सुधारण्यासाठी तुमच्या सिमच्या मागे  20 डिजीटचा नंबर विचारु शकतो. हॅकर्सला जर तुम्ही 20 डीजीट असलेला नंबर दिला, तर हॅकर्स तुम्हाला 1 नंबरचे बटण दाबायला सांगेल. 1 नंबरचे बटण दाबल्याने तुमच्याकडून नकळत सिम स्वॅपिंगची परवानगी घेतली जाते. टेलिकॉम कंपनी तुमची ही विंनती स्वीकारते. अशा प्रकारे तुमचे सिम कार्ड ब्लॉक होणार आणि दुसरे स्वॅप करण्यात आलेले सिम अॅक्टिव्हेट होते.

ओटीपी जनरेटसाठी वापर

सिम स्वॅप करणाऱ्या हॅकरजवळ आपल्या बँकेची सर्व माहिती असते किंवा डेबिट कार्डचा नंबर असतो. फक्त गरज असते ओटीपीची, सिम स्वॅपिंगच्या मदतीने त्यांना ओटीपी मिळतो. यानंतर काही मिनिटातचं तुमच्या अकाऊंटमधले सर्व पैसे ट्रान्सफर केले जातात.

आयसीआयसीआय बँकेने दिलेल्या टिप्स

  •  जर तुमच्या फोनमध्ये बराचवेळ नेटवर्क नसेल आणि तुम्हाला कोणता कॉल येत नसेल. तर तातडीने आपल्या मोबाईल ऑपरेटरशी संपर्क करा.
  •  तुमचा मोबाईल नंबर सोशल मीडियावर शेअर करु नका.
  •  तुम्हाला सिम स्वॅपचा संशय आल्यास तातडीने मोबाईल ऑपरेटरसोबत संपर्क करा.
  •  जर तुम्हाला सतत अज्ञात व्यक्तीचे कॉल येत असतील, तर फोन स्विच ऑफ करु नका. असे असू शकतं फसवणूक करणाऱ्यांना तुमचा फोन स्वीच ऑफ झाला, तर हॅकर्सना सिम स्वॅपिंग करण्यात सोयीस्कर होऊ शकते.
  •  तुमचे सर्व ट्रान्झॅक्शनबद्दल अपडेट्ससाठी मोबाईलनंबर आणि ईमेल दोन्ही अलर्ट ऑन ठेवावेत.
  •  प्रत्येक वेळेला नेहमी आपल्या बँकेचं स्टेटमेंट आणि ऑनलाईल बँकिंग ट्रान्झॅक्शन  हिस्ट्री चेक करावी.