ट्वीट करण्यासाठी आयफोनचा वापर, युजर्सकडून सॅमसंगचा समाचार

| Updated on: Jul 09, 2021 | 4:15 PM

मुंबई : जगभरात स्वत:चे फोन विकणाऱ्या सॅमसंगने ट्वीट करण्यासाठी अॅपलचा आयफोन वापरला. यानंतर सॅमसंगला ट्रोलर्सचा सामना करावा लागला. सॅमसंग आणि अॅपल या दोन्ही कंपन्यामध्ये नेहमीच स्पर्धा चालू असते. सॅमसंग एक स्वत: मोबाईल विश्वातील मोठी कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे आणि याच कंपनीने अॅपलचं प्रमोशन केल्याने युजर्सही आश्चर्य़चकित झाले. सॅमसंग आपल्या फोनच्या प्रमोशनसाठी ट्वीट करत असताना त्यांनी […]

ट्वीट करण्यासाठी आयफोनचा वापर, युजर्सकडून सॅमसंगचा समाचार
Samsung
Follow us on

मुंबई : जगभरात स्वत:चे फोन विकणाऱ्या सॅमसंगने ट्वीट करण्यासाठी अॅपलचा आयफोन वापरला. यानंतर सॅमसंगला ट्रोलर्सचा सामना करावा लागला. सॅमसंग आणि अॅपल या दोन्ही कंपन्यामध्ये नेहमीच स्पर्धा चालू असते. सॅमसंग एक स्वत: मोबाईल विश्वातील मोठी कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे आणि याच कंपनीने अॅपलचं प्रमोशन केल्याने युजर्सही आश्चर्य़चकित झाले. सॅमसंग आपल्या फोनच्या प्रमोशनसाठी ट्वीट करत असताना त्यांनी चक्क आयफोन वापरल. याबाबतचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होता आहे.
या ट्वीटला काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध युटूबर मार्कस ब्राउनलीने पाहिले होते. असे ट्वीट एकदा नाही तर त्याने दोन वेळा पाहिले आहे. पहिले ट्वीट सॅमसंगने सौदीमध्ये 18 नोव्हेंबरला केले होते, त्यामध्ये गॅलेक्सी नोट 9 च्या सुपर एमोलेड डिस्प्ले संबधित चर्चा चालू होती. या पोस्टलाही आयफोनमधून ट्वीट केले होते. तर दुसऱ्यांदाही अशीच घटना पुन्हा समोर आली आहे. जेव्हा @samsungonline ने 25 नोव्हेंबरला एक पोस्ट गॅलेक्सी नोट 9 च्या इंफिनिटी डिस्प्ले संबधित केली होती आणि ही पोस्ट सुद्धा आयफोनमधून केली होती.
दरम्यान जे ट्वीट पोस्ट करण्यात आले होतं ते अॅपच्या मदतीने केले होते की वेबसाईटच्या मदतीने हे अजूनही स्पष्ट करण्यात आले नाही. कारण बऱ्याचदा काही अशा थर्ड पार्टी अॅप्स आहेत जे पोस्ट केल्यानंतर तुमच्या डिवाईसबद्दल संपूर्ण माहिती देतात.
फोटोमध्ये आपण पाहू शकता खाली उजव्या बाजूला आयफोनचे नाव दिसत आहे.