सूर्यावर सौरज्वालांमुळे मोठा स्फोट… सौरवादळाचा पृथ्वीवरही परिणाम होणार

| Updated on: Oct 06, 2022 | 12:05 AM

2 ऑक्टोबर रोजी सूर्यावर हे मोठं सौरवादळ तयार झाले होते. यामुळे मोठ्या प्रमाणात सौर ज्वाळा म्हणजे सोलर फ्लेयर तयार झाले होते.

सूर्यावर सौरज्वालांमुळे मोठा स्फोट... सौरवादळाचा पृथ्वीवरही परिणाम होणार
Follow us on

नवी दिल्ली : सौरज्वालांमुळे सूर्यावर मोठा स्फोट झाला आहे. अमेरिकने अंतराळ संस्था नासाॉच्या कॅमेऱ्यात सूर्यावरील स्फोटाचा फोटो कैद झाला आहे. नासाने याचे फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये सूर्याभोवती आगीच्या ज्वाळा दिसत आहेत. या सौरवादळाचा पृथ्वीवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

2 ऑक्टोबर रोजी सूर्यावर हे मोठं सौरवादळ तयार झाले होते. यामुळे मोठ्या प्रमाणात सौर ज्वाळा म्हणजे सोलर फ्लेयर तयार झाले होते.
सूर्याभोवती ज्वाळांचे कडं तयार झाले होते. नासाच्या सोलर डायनॅमिक वेधशाळेने या खगोलीय घटनेचा फोटो कॅमेऱ्यात कैद केला आहे.

यापूर्वी एप्रिल महिन्यात देखील अशा प्रकारचे वादळ आले होते. या सौरवादळामुळे निर्माण झालेल्या या सौरज्वाळांचा फटका पृथ्वीलाही बसणाक असून मोठ संकट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सौर वादळ का येते

हे वादळ म्हणजे सूर्यापासून निघणारा एक प्रकारचा किरणोत्सर्ग आहे, त्यामुळे उष्णता वाढते. ज्याला पृथ्वीवर पोहोचण्यासाठी 15 ते 18 तास लागतात.

सौर वादळ म्हणजे नेमकं काय?

या वादळामुळे सूर्याच्या पृष्ठभागावर स्फोट होऊन मोठ्या ज्वाळा तयार होतात. यातून मोछा किरणोत्सर्गार होतो. कित्येक वेळा सूर्यापासून निघालेले रेडिएशन बऱ्याच वेळा पृथ्वीपर्यंत पोहोचते. मात्र, पृथ्वीच्या गाभ्यातून निघणाऱ्या चुंबकीय तरंगांमुळे पृथ्वीच्या भोवती एक प्रकारचं सुरक्षा कवच तयार झालेलं असतं; जे आपल्याला या रेडिएशनपासून वाचवतं. सौरवादळाच्या वेळी मात्र रेडिएशन अगदीच जास्त प्रमाणात बाहेर पडल्यामुळे हे कवच भेदले जाते.

सौर वादळाचे परिणाम

हे सौर वादळ रेडिओ सिग्नल्समध्ये व्यत्यय आणू शकतात. GPS नेव्हिगेशन, मोबाईल फोन सिग्नल आणि सॅटेलाइट टीव्हीमध्ये व्यत्यय येऊ शकतो. पॉवर लाईनमधील करंट जास्त असू शकतो, ज्यामुळे ट्रान्सफॉर्मर देखील उडू शकतो. यामुळे जीपीएस, तसेच मोबईल नेटवर्कवर याचा परिणाम होऊ शकतो. तसेच पॉवर ग्रीडवरही त्याचा परिणाम होऊ शकतो.