Viral Video: ए हो…हे पक्षी माणसासारखं हसतायत! कमाले बुआ निसर्गाची…

| Updated on: Jul 30, 2022 | 5:08 PM

अजूनही असे निसर्गातले काही घटक आहेत ज्याचा शोध कदाचित माणसाला लागला नसेल. एक अनोखा व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात पक्षी चक्क माणसासारखे हसतायत. ते बघून आधी तुम्हाला धक्का बसेल, नंतर हसू येईल आणि तुम्ही हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा बघाल.

Viral Video: ए हो...हे पक्षी माणसासारखं हसतायत! कमाले बुआ निसर्गाची...
Seagull Bird
Image Credit source: Social Media
Follow us on

निसर्ग! निसर्ग ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला कायम आश्चर्यचकित करते. निसर्गाचे सरप्राईझ (Surprise) कधीच न संपणारे असतात. निसर्गाने दोन्ही हाताने देत राहावं आणि आपण न लुटता बघत बसावं, त्याचा आनंद घ्यावा. वेगवेगळी झाडं, वेगवेगळे प्राणी पक्षी, त्यांचे वेगवेगळे आवाज, रंग…कमाल! अजूनही असे निसर्गातले (Nature) काही घटक आहेत ज्याचा शोध कदाचित माणसाला लागला नसेल. एक अनोखा व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होतोय ज्यात पक्षी चक्क माणसासारखे हसतायत. ते बघून आधी तुम्हाला धक्का बसेल, नंतर हसू येईल आणि तुम्ही हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा बघाल.

पक्ष्याला माणसासारखं हसताना पाहिलंय का?

या जगात किती प्राणी आणि इतके पक्षी राहतात. तुम्हाला अनेक प्राण्यांबद्दल माहिती असली, तरी अनेक प्राण्यांबद्दल तुम्ही अनभिज्ञ असता. तुम्ही कधी एखाद्या पक्ष्याला माणसासारखं हसताना पाहिलंय का? किंवा तुम्ही एखाद्या पक्षाचा आवाज ऐकून तुम्हाला असं वाटलंय का की, अरेच्चा हा तर माणसाच्या हसण्याचा आवाज आहे. जर असा आवाज तुम्ही कधी ऐकला नसेल तर आज आम्ही तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आहोत, ज्यात दोन सीगल पक्षी हसताना दिसून येतायत. ते हुबेहूब माणसासारखं हसत आहेत.

तुम्ही कधी सीगल्सना असं हसताना ऐकलं आहे का?

एक व्हिडिओ समोर आला आहे. यात दोन सीगल्स बसलेले दिसतात. अचानक एक सीगल हसू लागतो. हे हुबेहूब माणसासारखं हसत आहेत. खरं तर हा सीगल पक्ष्याचा नैसर्गिक आवाज आहे. पहिला एक पक्षी हसतो, मग त्याला बघून दुसरा हसतो, मग ते दोघंही हसतात. या व्हिडीओमध्ये जेव्हा लोकांनी दोन्ही सीगल्सना हसताना पाहिलं तेव्हा त्यांना हा व्हिडिओ खूप आवडला. एका युझरने लिहिले की, हा व्हिडिओ हुबेहूब असा दिसत होता की, वर्गात कोणीतरी एकदा हसू लागले होते आणि मग संपूर्ण वर्गाचे हसणे नियंत्रित केले जात नव्हते. तुम्ही कधी सीगल्सना असं हसताना ऐकलं आहे का?