Video : पॅराग्लायडिंग करताना घाबरलेल्या तरूणाला आलियाचा सल्ला, काही सेकंदात शांत, पाहा नेमकं काय म्हणाली…

हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर खूप जास्त व्हायरल होत आहे. याला एक लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलंय. 

Video : पॅराग्लायडिंग करताना घाबरलेल्या तरूणाला आलियाचा सल्ला, काही सेकंदात शांत, पाहा नेमकं काय म्हणाली...
| Edited By: | Updated on: May 12, 2022 | 5:55 PM

मुंबई : पॅराग्लायडिंग (Paragliding) करताना अंगावर अक्षरश: काटा येतो. अनेकांना भिती वाटते पण यावर अभिनेत्री आलिया भटने (Alia Bhatt) एक ट्रिक शोधून काढली आहे. त्याचा व्हीडिओ सध्या चर्चेत आहे. काही वर्षांपूर्वी एका व्यक्तीच्या व्हीडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. ही व्यक्ती पॅराग्लायडिंग करताना ‘भाऊ, मला सहन नाही होत, प्लीज कसं तरी मला खाली उतरवा’ अशं म्हणताना दिसत होती. ती व्यक्ती म्हणजे विपिन कुमार… विपिन कुमार (Vipin Kumar) आणि आलिया या व्हीडिओत दिसत आहेत.

व्हायरल व्हीडिओ

विपिन कुमार आलिया भट्ट यांचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात आलियासोबत विपिन पॅराग्लायडिंग करताना दिसत आहे. या व्हीडिओमध्ये विपिन कुमार ज्या स्टाईलमुळे चर्चेत आला तीच गोष्ट करताना दिसत आहे. यात तो चारो तरफ कोहरा… मै पागल था जो वापस यहीं आ गया… भाई लंबी राईड नहीं करानी, भाई लॅन्ड करादे भाई …, असं म्हणताना तो दिसत आहे. त्यावर आलिया त्याला एक आयडिया देते. त्याच्या समोर कॅडबरी पर्क पकडते अन् त्याच्या डोक्याला हात लावते. पर्क खा लाईट व्हा, अशी याची टॅग लाईन आहे. पर्कच्या जाहिरातीत आलिया आणि विपिन पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळत आहेत.

हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर खूप जास्त व्हायरल होत आहे. याला एक लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलंय.