काय म्हणायचं आता? ऑनलाईन ऑर्डर केला ड्रोन कॅमेरा; हातात मिळाला बटाटा

| Updated on: Sep 28, 2022 | 10:25 PM

एका व्यक्तीने ड्रोन कॅमेरा मागवला होता. मात्र, त्याला बटाट्याचे पार्सल मिळाले आहे.

काय म्हणायचं आता? ऑनलाईन ऑर्डर केला ड्रोन कॅमेरा; हातात मिळाला बटाटा
Follow us on

नवी दिल्ली : ऑनलाईन साईटवरुन शॉपिंग करणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. या व्यक्तीने ड्रोन कॅमेरा ऑनलाईन ऑर्डर केला होता. मात्र, घरी पार्सल आल्यावर बॉक्स उघडताच या व्यक्तीला धक्का बसला. कारण या बॉक्समध्ये ड्रोन कॅमेऱ्या ऐवजी बटाटे होते.
सध्या ऑनलाई शॉपिंगचा ट्रेंड वाढला आहे. मात्र, या ऑनलाईन दरम्यान अनेकांना आर्थिक फसवणुकीला सामोरे जावे लागत आहे. तर अनेकांना पार्सल ऐवजी भलत्याच वस्तु मिळाल्याच्या तक्रारी आल्या आहेत.

असाच एक विचित्र अनुभव एका व्यक्तीला आला आहे. एका व्यक्तीने ड्रोन कॅमेरा मागवला होता. मात्र, त्याला बटाट्याचे पार्सल मिळाले आहे.
बिहारच्या नालंदा येथील व्यक्तीला हा अनुभव आला आहे. या व्यक्तीने मीशो अॅपवरुन(meesho app) ड्रोन कॅमेरा ऑर्डर केला होता. मात्र, त्याला पार्सलमध्ये बटाटे मिळाले आहेत.

हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ड्रोन कॅमेरा ऑर्डर करणाऱ्या व्यक्तीला मिळालेले पार्सलचे बॉक्स अत्यंत खराब अवस्थेत होते.
यामुळे या व्यक्तीने डिलिव्हरी बॉयलाच पार्सलचे पॅकेज उघडण्यास सांगितले. पॅकेज उघडले असता त्यात ड्रोन नाही तर बटाटे भरलेले होते.

ऑर्डर करणाऱ्या व्यक्तीने याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच रिफंडची रिक्वेस्ट देखील टाकली आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात येईल असे मिशो कंपनीकडून सांगण्यात आले.