Viral Video: वाचला भो…वाचला! ट्रक अंगावरून गेला पण हा जशाच्या तसा उठून बसला…

| Updated on: Aug 08, 2022 | 4:30 PM

आजकाल असाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे, ज्यामध्ये एक माणूस मुद्दाम ट्रकखाली येतो आणि ट्रक त्याच्यावरून गेल्यानंतरही त्याचा जीव वाचला हे पाहून आणखीनच आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

Viral Video: वाचला भो...वाचला! ट्रक अंगावरून गेला पण हा जशाच्या तसा उठून बसला...
Video Viral
Image Credit source: Social Media
Follow us on

अपघातांची (Accident) माहिती नसते. ते कधीही, कुठेही होतात, पण काही लोक असे असतात की जे त्यांना जाणूनबुजून अपघात म्हणतात. वेगानं गाडी चालवणारे, ते गाडी जोरात गाडी चालवतात, पण मग तोल सांभाळता येत नाही आणि एकतर स्वत:च अपघातांना बळी पडतात किंवा इतरांच्या गाडीवर जाऊन आदळतात. त्यांच्यामुळे इतर लोकांनाही नाहक त्रास सहन करावा लागतो. असे सर्व व्हिडिओ तुम्हाला सोशल मीडियावर (Social Media) पाहायला मिळतील, जे खूपच आश्चर्यकारक आहेत. आजकाल असाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे, ज्यामध्ये एक माणूस मुद्दाम ट्रकखाली येतो आणि ट्रक त्याच्यावरून गेल्यानंतरही त्याचा जीव वाचला हे पाहून आणखीनच आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

तो माणूस ट्रक अंगावर जाऊन सुद्धा वाचतो

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक माणूस रस्त्यावर धावणाऱ्या ट्रकला कसा रोखण्याचा प्रयत्न करतो, जो कदाचित कचऱ्याचा ट्रक आहे. मात्र, ट्रक थांबत नाही, तेव्हा तो ट्रकच्या पुढे उडी मारण्याचा प्रयत्न करतो, पण तोपर्यंत ट्रक पुढे सरकतो. मग हे पाहून तोही थोडा पुढे जातो आणि अचानक ट्रकच्या चाकाखाली पडतो.ट्रक त्याच्या अंगावरून जातो. आपल्याला 2 सेकंद असं वाटतं, हा आता गेला! आता काय हा वाचत नाही. पण चमत्कार होतो. तो माणूस ट्रक अंगावर जाऊन सुद्धा वाचतो. ट्र्क त्याच्या अंगावरून जातो आणि तो गेल्यानंतर हा माणूस चक्क उठून बसतो. हा चमत्कारच की!

तो माणूस चमत्कारिकरीत्या कसा वाचला पाहा व्हिडिओत

‘सुसाइड फेल’

हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर क्रेझी ट्विट्स नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला असून कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘सुसाइड फेल’. 22 सेकंदाच्या या व्हिडिओला आतापर्यंत कित्येक हजार व्ह्यूज मिळाले आहेत, तर शेकडो लोकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे. त्याचबरोबर लोकांनी व्हिडिओ पाहून विविध प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एक ट्रक त्याच्या अंगावर धावून गेला आणि त्याला काहीच झालं नाही हे पाहून लोकही आश्चर्यचकित झाले आहेत.