ये देखो मॉडर्न रोमिओ! भिकाऱ्याने बायकोला दिलं 90 हजारांचं गिफ्ट, चर्चा तर होणारच ना!

| Updated on: May 24, 2022 | 11:08 AM

पत्नीला असं सायकल ढकलताना पाहून संतोषला खूप वाईट वाटायचं. त्यामुळे ती आजारीदेखील पडायची. एकेदिवशी त्याने ठरवलं की तो आपल्या पत्नीसाठी गाडी खरेदी करेल. संतोषचं पत्नीवरचं प्रेम आणि काळजी यामुळे त्याला मोपेड खरेदी करण्याची प्रेरणा मिळाली. दिवसाला 300-400 रुपये कमावणाऱ्या व्यक्तीसाठी मोपेड खरेदी करणं अजिबात सोपं नव्हतं.

ये देखो मॉडर्न रोमिओ! भिकाऱ्याने बायकोला दिलं 90 हजारांचं गिफ्ट, चर्चा तर होणारच ना!
Follow us on

मुंबई : सोशल मीडियावर विविध गोष्टींची चर्चा होते. सध्या अश्याच एका अनोख्या गोष्टीची सोशल मीडियावर (Viral News) चर्चा होतेय. एका भिकाऱ्याने त्याच्या बायकोला महागडं गिफ्ट दिलंय. त्याने त्याच्या बायकोला 90 हजाराचं गिफ्ट दिलंय. मध्य प्रदेशामधील छिंदवाडा जिल्ह्यातील ही घटना आहे. संतोष साहू (Santosh Sahu) या व्यक्तीने आपल्या पत्नीला हे महागडं गिफ्ट दिलंय. त्याने तिला लुना(मोपेड गाडी) दिलीये. त्यासाठी त्याने चार वर्ष मेहनत केली एक एक पैसा जोडतं आपल्या बायकोला हे गिफ्ट दिलंय. संतोष दिव्यांग आहे. त्याची पत्नी मुन्नीबाई साहू ट्रायसायकलवर फिरून भीक मागायचे. संतोष ट्रायसायकलवर बसायचा तर त्याची बायको ट्रायसायकल ढकलायची. काहीवेळा नंतर रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे तिला त्रास होऊ लागला त्यामुळे त्याने तिला हे गिफ्ट दिलं. ते गिफ्ट आहे लुना गाडी. त्यामुळे आता या जोडप्याला सुखी जीवन जगता येईल.

नेमकं काय घडलं?

एका भिकाऱ्याने त्याच्या बायकोला महागडं गिफ्ट दिलंय. त्याने त्याच्या बायकोला 90 हजाराचं गिफ्ट दिलंय. मध्य प्रदेशामधील छिंदवाडा जिल्ह्यातील ही घटना आहे. संतोष साहू या व्यक्तीने आपल्या पत्नीला हे महागडं गिफ्ट दिलंय. त्याने तिला लुना(मोपेड गाडी) दिलीये. त्यासाठी त्याने चार वर्ष मेहनत केली एक एक पैसा जोडतं आपल्या बायकोला हे गिफ्ट दिलंय. संतोष दिव्यांग आहे. त्याची पत्नी मुन्नीबाई साहू ट्रायसायकलवर फिरून भीक मागायचे. संतोष ट्रायसायकलवर बसायचा तर त्याची बायको ट्रायसायकल ढकलायची. काहीवेळा नंतर रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे तिला त्रास होऊ लागला त्यामुळे त्याने तिला हे गिफ्ट दिलं. ते गिफ्ट आहे लुना गाडी. त्यामुळे आता या जोडप्याला सुखी जीवन जगता येईल.

पत्नीला असं सायकल ढकलताना पाहून संतोषला खूप वाईट वाटायचं. त्यामुळे ती आजारीदेखील पडायची. एकेदिवशी त्याने ठरवलं की तो आपल्या पत्नीसाठी गाडी खरेदी करेल. संतोषचं पत्नीवरचं प्रेम आणि काळजी यामुळे त्याला मोपेड खरेदी करण्याची प्रेरणा मिळाली. दिवसाला 300-400 रुपये कमावणाऱ्या व्यक्तीसाठी मोपेड खरेदी करणं अजिबात सोपं नव्हतं. पण संतोषने न खचता एक एक पैसा वाचवून पत्नीसाठी मोपेड खरेदी केली. भीक मागणाऱ्या संतोषने त्याच्या पत्नीला दिलेलं हे गिफ्ट पाहून अनेकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसलाय. यासाठी त्याने चार वर्षे पैश्यांची जुळवा जुळव केली. संतोष साहू याने पत्नीला दिलेलं हे गिफ्ट सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. या दोघांची लव्हस्टोरी सध्या चर्चेचा विषय बनली आहे.