‘बिस्किटा’ला महागाईची झळ, ‘ब्रिटानिया’ वाढविणार दर; सर्वसामान्यांना फटका

| Updated on: Mar 31, 2022 | 7:14 PM

ब्लूमबर्गच्या एका अहवालानुसार ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमिटेड यंदाच्या वर्षी आपल्या बिस्किटांच्या किंमतीत सात टक्क्यांनी वाढ करण्याची शक्यता आहे. बिस्किटच्या किंमती वाढविण्याच्या कंपनीच्या निर्णयामुळे भारतातील मध्यमवर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीयांना थेट फटका बसणार आहे.

‘बिस्किटा’ला महागाईची झळ, ‘ब्रिटानिया’ वाढविणार दर; सर्वसामान्यांना फटका
रशिया-युक्रेन युद्धामुळे ब्रिटानिया बिस्किटचे दर वाढणार
Image Credit source: TV9
Follow us on

नवी दिल्लीःमहागाईच्या आगडोंबात होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना आणखी झळ बसण्याची शक्यता आहे. महागाईचे वाढते दर, कच्च्या मालाच्या गगनाला भिडलेल्या किंमती, रशिया-युक्रेन विवादामुळं (Russia-Ukraine crisis) खंडित खाद्यान्नाच्या पुरवठा साखळीचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे. भारतातील सर्वात मोठी बिस्किट उत्पादक कंपनी (Buiscuit Company) ब्रिटानिया आपल्या प्रॉडक्टच्या किंमतीत लवकरच वाढ करण्याची शक्यता आहे. ब्लूमबर्गच्या एका अहवालानुसार ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमिटेड यंदाच्या वर्षी आपल्या बिस्किटांच्या किंमतीत सात टक्क्यांनी वाढ करण्याची शक्यता आहे. बिस्किटच्या किंमती वाढविण्याच्या कंपनीच्या निर्णयामुळे भारतातील मध्यमवर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीयांना थेट फटका बसणार आहे. रशिया-युक्रेन विवादामुळे अन्नपुरवठा साखळी खंडित (Food Suplly) झाली आहे. त्यामुळे खाद्यान्नाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत.

बिस्किटावर महागाईचा इफेक्ट:

ब्रिटानिया ही भारताची आघाडीची बिस्किट उत्पादक कंपनी आहे. बंगळुरु स्थित कंपनीच्या मुख्यालयात कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक वरुण बैरी यांनी किंमतीच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. कोविडमुळे ब्रिटानिया कंपनीला आजवरचा सर्वात मोठ्या तोट्याला सामोरं जावं लागलं आहे. चालू वर्षी महागाईचा दर 3 टक्के असण्याची शक्यता होती. मात्र, रशिया-युक्रेनच्या चिघळणाऱ्या विवादामुळं महागाईचा दर 8-9 टक्क्यांवर पोहोचला आहे.
बिस्किट ते ब्रेड:

रशिया-युक्रेन विवादामुळं खाद्यान्नाच्या साखळीवर मोठा परिणाम झाला आहे. दैनंदिन वापराच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. ब्रिटानियाच्या केवळ बिस्कीटच नाही तर ब्रेड, केक व अन्य डेअरी उत्पादने देखील बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीला असतात.

कमाईत 19 टक्के घट-

ब्रिटानिया कंपनी 130 वर्षाहून अधिक जुनी कंपनी मानली जाते. गुड डे, मेरी गोल्ड, टायगर, 50-50, बर्बन, मिल्क बिकिस, लिटिल हार्ट्स जैसे लोकप्रिय आणि पसंतीचे बिस्किट बनवते. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्याच्या तिमाहित ब्रिटानियाच्या कमाईत 19 टक्क्यांनी घट नोंदविली गेली होती. अर्थजाणकरांच्या मते, ब्रिटानिया कंपनीच्या आजवरच्या आर्थिक वाटचालीतील सर्वात मोठा फटका होता. कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी कच्च्या मालाच्या वाढत्या किंमतीमुळे वस्तूच्या उत्पादनात वाढ होत असल्याचे म्हटले आहे.

बिस्किटांची शंभर वर्षाची परंपरा:

ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमिटेड ही खाद्य उद्योगात विशेष प्राविण्य असलेली भारतीय कंपनी आहे, जी नुस्ली वाडिया यांच्या अध्यक्षतेखालील वाडिया समूहाचा भाग आहे. 1892 मध्ये स्थापन झालेली आणि कोलकाता येथे मुख्यालय असलेली, ही भारतातील सर्वात जुन्या विद्यमान कंपन्यांपैकी एक आहे आणि बिस्किट उत्पादनांसाठी प्रसिद्ध आहे.

संबंधित बातम्या

Rajesh Tope on Mumbai Local : राज्यातील निर्बंध उठवले, पण Local निर्बंधांचं काय? आरोग्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं!

महाराष्ट्रात मास्क सक्ती नाही, कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय : Jitendra Awhad

AAP BJP Video: महाराष्ट्रात ‘आप’चा बाप कोण? काँग्रेस, राष्ट्रवादी की शिवसेना? प्रसाद लाड यांचे नेत्याचं नाव घेत थेट आरोप