KVP| सल्ला तज्ज्ञांचा, निर्णय तुमचा: ‘या’ चार कारणांमुळे किसान विकास पत्रमध्ये गुंतवणूक टाळण्याचा दिला जातो सल्ला

| Updated on: Jan 07, 2022 | 8:27 PM

आयकर अधिनियम, कलम 80 सी अंतर्गत बचत योजनांतील दीड लाखांपर्यंतची गुंतवणूक कर वजावटीस पात्र ठरते. दरम्यान, किसान विकास पत्रातील गुंतवणुकीवर कलम 80-सी अंतर्गत कोणत्याही प्रकारची कर सवलत मिळत नाही.

KVP| सल्ला तज्ज्ञांचा, निर्णय तुमचा: या चार कारणांमुळे किसान विकास पत्रमध्ये गुंतवणूक टाळण्याचा दिला जातो सल्ला
debt relief Don't lend today by mistake or you will suffer bad consequences
Follow us on

नवी दिल्ली- आपत्कालीन स्थितीत पैशांच्या उपलब्धतेसाठी गुंतवणुकीची पुंजी कामाला येते. विविध गुंतवणूक साधनांचा वापर करुन पैसे गुंतवणूक करण्याकडे सर्वांचा कल असतो. पैशाची सुरक्षितता व सर्वोत्तम परतावा हे आदर्श गुंतवणुकीचे निकष ठरतात. मात्र, गुंतवणुकीच्या फायद्यांची बाजू समजावून घेताना संभाव्य तोटेही ओळखायला हवेत.

किसान विकास पत्र (KVP) गुंतवणुकीला अलीकडे प्राधान्य वाढले आहे. मात्र, केव्हीपीमध्ये लाभासोबत गुंतवणुकीचे काही तोटेही आहेत. कुणासाठी केव्हीपी प्लॅन अनुरुप ठरेल ‘पॉईंट टू पॉईंट’ जाणून घेऊया-

1. किसान विकास पत्राच्या गुंतवणुकीवर 7.3 टक्के व्याज दर मिळतो (1 जानेवारी 2018 पासून). केव्हीपी समकक्ष असलेल्या गुंतवणूक श्रेणी जसे की- पीपीएफ अकाउंट, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र आणि मुदत ठेवी यांच्या तुलनेत अत्यल्प आहे. अन्य योजनेत मिळणारे लाभ KVP गुंतवणुकीद्वारे उपलब्ध नाहीत.

 

2. आयकर अधिनियम, कलम 80 सी अंतर्गत बचत योजनांतील दीड लाखांपर्यंतची गुंतवणूक कर वजावटीस पात्र ठरते. दरम्यान, किसान विकास पत्रातील गुंतवणुकीवर कलम 80-सी अंतर्गत कोणत्याही प्रकारची कर सवलत मिळत नाही. पीपीएफ अकाउंट आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रातील गुंतवणुकीवर करात सवलत मिळते. बँकेसह पाच वर्षांसाठी केलेल्या मुदत ठेवींच्या गुंतवणुकीवर कलम 80-सी अंतर्गत देखील कर सवलत मिळते.

3. किसान विकास पत्रातून मिळणाऱ्या व्याजावर कर देय करावा लागतो. या योजनेअंतर्गत व्याजातून प्राप्त होणारे पैसे ‘ अन्य स्त्रोतांकडील उत्पन्न’ कक्षेत येतात. मात्र, पीपीएफ व अन्य बचत योजनांवरील व्याज करमुक्त असते.

 

4. किसान विकास पत्राचा लॉक-इन कालावधी अन्य मुदत ठेव योजनांहून अधिक आहे. बँकेत ठेवलेल्या मुदत ठेवीतून किमान दंडात्मक शुल्क अदा करुन मुदतीपूर्वीचे पैसे प्राप्त केले जाऊ शकतात.

तुम्ही किसान विकास पत्रात गुंतवणूक करण्यापूर्वीच वरील 4 मुद्द्यांचा नक्कीच विचार करा. तुमच्यासाठी अनेक गुंतवणुकीचे पर्याय नक्कीच उपलब्ध आहेत. गुंतवणुकदारांने सर्वप्रथम पीपीएफ खात्यात गुंतवणुकीचा पर्याय अजमावयाला हवा. निधीची सुरक्षितता, पैशांचा परतावा तसेच कर लाभ या गुंतवणुकीवर उपलब्ध असतात. तुम्ही वर्षाला दीड लाखांपर्यंत गुंतवणुकीसाठी किसान विकास पत्रासोबतच मुदत ठेव आणि राष्ट्रीय बचत पत्रासारखे पर्याय उपलब्ध असतील.