सोनं गहाण ठेऊन कर्ज घ्यायचेय, जाणून घ्या कोणत्या बँकेत सर्वाधिक कमी व्याजदर?

Gold Loan | सध्या बँकांशिवाय इतर काही संस्थाही सोने तारण ठेवून कर्ज देतात. एसबीआय गोल्ड आणि मुथूट फायनान्स सोने तारण ठेऊन कर्ज देणाऱ्या आघाडीच्या संस्था आहेत. मात्र, सोने तारण कर्जावरील व्याजही जास्त असते. त्यामुळे ग्राहक कायम कमी व्याजदर आकारणाऱ्या पर्यायांच्या शोधात असतात.

सोनं गहाण ठेऊन कर्ज घ्यायचेय, जाणून घ्या कोणत्या बँकेत सर्वाधिक कमी व्याजदर?
जर कोणाला फिजिकल सोने हवे असेल तर ईजीआरला तिजोरीत सरेंडर करावे लागेल. वॉल्ट मॅनेजर ग्राहकाला EGR घेऊन फिजिकल सोने देईल, तिथे EGR रद्द होईल. रद्द केलेल्या ईजीआरची माहिती एक्सचेंज, डिपॉझिटरी, क्लिअरिंग कॉर्पोरेशनलाही पाठवली जाईल. वितरित केलेल्या सोन्याच्या गुणवत्तेवर वाद असल्यास, स्वतंत्र एजन्सीचा अहवाल वैध असेल.
| Edited By: | Updated on: Jul 26, 2021 | 9:43 AM

मुंबई: कोरोना संकटामुळे सध्या अनेकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. नोकरी नसल्यामुळे अनेकांना दैनंदिन खर्च चालवण्यासाठीही कर्ज घ्यावे लागत आहे. बँकांच्या अटी-शर्तींमुळे सामान्य लोकांना पटकन कर्ज मिळत नाही. त्यामुळे अनेकजण घरातील सोने गहाण (Gold loans) ठेऊन पैसे कर्जाऊ घेत आहेत. (How to Avail gold loan what is intrest rates)

सध्या बँकांशिवाय इतर काही संस्थाही सोने तारण ठेवून कर्ज देतात. एसबीआय गोल्ड आणि मुथूट फायनान्स सोने तारण ठेऊन कर्ज देणाऱ्या आघाडीच्या संस्था आहेत. मात्र, सोने तारण कर्जावरील व्याजही जास्त असते. त्यामुळे ग्राहक कायम कमी व्याजदर आकारणाऱ्या पर्यायांच्या शोधात असतात.

कोणत्या बँकेत किती टक्के व्याजदर?

मण्णपुरम फायनान्स- 29 टक्के
मुथुट फायनान्स- 24 ते 26 टक्के
एक्सिस बँक- 13 टक्के
एसबीआय बँक- 7 ते 7.5 टक्के
आयसीआयसीआय बँक- 7.4 टक्के
एचडीएफसी बँक- 8.9 टक्के ते 17.23 टक्के
कॅनरा बँक- 7.35 टक्केपंजाब अँण्ड सिंध बँक- 7 टक्के
बँक ऑफ इंडिया- 7.30 टक्के
कॅनरा बँक- 7.35 टक्के
युको बँक- 8.50 टक्के

किती कर्ज मिळते?

तुम्ही सोन्यावर 10 हजारापासून एक कोटी रुपयांचे कर्ज घेऊ शकता. पण तुमच्याकडील सोन्याच्या दागिन्यांवर किती कर्ज द्यायचे याचे नियम प्रत्येक बँकेत वेगवेगळे असतात. सोन्याच्या एकूण किंमतीच्या 75 टक्के रक्कम कर्ज म्हणून दिली जाते. 22 कॅरेट सोन्याचा किंमत ही आधारभूत किंमत असते. तुमच्याकडे कमी कॅरेटचे सोने असेल तर कर्जही कमी मिळेल. तुम्ही एक लाखांचे सोने गहाण ठेवले तर तुम्हाला 75 हजारांचे कर्ज मिळेल. एसबीआयकडून 20 हजारापासून 20 लाखांपर्यंत सोने तारण कर्ज दिले जाते. मुथुट फायनान्सकडून किमान 1500 रुपयांपासून कोणत्याही रक्कमेचे कर्ज दिले जाते.

सोने तारण ठेवून कर्ज घेण्यासाठी तुम्हाला संबंधित बँकेच्या शाखेत जावे लागते. त्याठिकाणी तुमच्याकडील सोन्याच्या दागिन्यांची तपासणी केली जाते. त्यानंतर काही कायदेशीर बाबींची पूर्तता करुन तुम्हाला सोने दिले जाते. सोन्याच्या किंमतीनुसार तुम्हाला मिळणाऱ्या कर्जाची रक्कम ठरते.

संबंधित बातम्या:

चालू आर्थिक वर्षात सोन्याच्या आयातीत 3.3 टक्के घट, व्यापार तूट कमी करण्यास मदत

Gold: अबब! कोरोनाच्या संकटकाळातही भारतात इतक्या टन सोन्याची आयात

Gold: देशात एप्रिल-मे महिन्यात सोन्याची प्रचंड आयात; भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका