TAX SAVING TIPS: पगारवाढीचं सेलिब्रेशन, इन्कम टॅक्सचं ‘नो टेन्शन’! वाचा- कर बचतीचा कानमंत्र

| Updated on: Apr 05, 2022 | 10:32 PM

आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच कर व्यवस्थापनाचं गणित (Tax Calculation) विचारात घ्यायला हवं. अखेरच्या मिनिटाला केलेलं व्यवस्थापन आर्थिक भुर्दंडास कारण ठरू शकतं.

TAX SAVING TIPS: पगारवाढीचं सेलिब्रेशन, इन्कम टॅक्सचं ‘नो टेन्शन’! वाचा- कर बचतीचा कानमंत्र
सॅलरीत वाढ, कुठे पैसे गुंतवाल?
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

नवी दिल्ली : नवीन आर्थिक वर्षासोबत नोकरदारांना वेतनवाढीचे (Salary Increment) वेध लागतात. सर्व कंपन्यांत वार्षिक वेतनवाढीची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. तर काही कंपन्यांत प्रत्यक्ष वेतनवाढ कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्गही करण्यात आली असेल. वाढत्या पगारासोबत कर्मचाऱ्यांना प्रश्न भेडसावतो आयकर व्यवस्थापनाचा. अतिरिक्त करबोजा सुव्यवस्थितपणे टाळून पैशांचे नियोजन करण्याकडे प्रत्येकाचा कल असतो. त्यामुळे कर नियोजनात महत्वाचं ठरते करपात्र गुंतवणूक स्त्रोतांची परिपूर्ण माहिती. आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच कर व्यवस्थापनाचं गणित (Tax Calculation) विचारात घ्यायला हवं. अखेरच्या मिनिटाला केलेलं व्यवस्थापन आर्थिक भुर्दंडास कारण ठरू शकतं. आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला देखील काही आपल्या नोकरीमध्ये बदल करतात. नोकरीमध्ये बदल केल्यास त्यांचे उत्पन्न वाढते. मात्र अशा व्यक्तींनी जर टॅक्सचे योग्य नियोजन करून, ज्या योजनांमधील गुंतवणुकीवर टॅक्समध्ये सूट मिळते (Tax Saving Schemes) असा योजनेत गुंतवणूक केल्यास त्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.

कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी

कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी (Employee’s Provident Fund) अर्थात ईपीएफ (EPF) द्वारे अन्य गुंतवणुक पर्यायांपेक्षा अधिक परतावा मिळतो. ईपीएफ मध्ये केलेली गुंतवणूक करपात्र समजली जाते. दीर्घ मुदतीची बचत योजना आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला एफडीच्या तुलनेत चांगला परतावा मिळतो. ईपीएफ मध्ये केलेल्या गुंतवणुकीवर तुम्हाला इनकम टॅक्स कायद्याच्या कलम 80C अंतर्गत सूट मिळते.

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC)

ही एक पाच वर्षांची बचत योजना आहे. या योजनेतून देखील बँकाच्या योजनेच्या तुलनेत चांगला परतावा मिळतो. नॅशन सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेतील व्याजदर हे सातत्याने बदलत असतात. तुम्ही तुमच्या जावळच्या पोस्ट ऑफीस कार्यालयात जाऊन या योजनेंतर्गंत खाते ओपन करू शकता. या योजनेत पैसे गुंतवल्यास तुम्हाला इनकम टॅक्स कायद्याच्या कलम 80C अंतर्गत सूट मिळते.

नॅशनल पेंशन सिस्टीम

ही एक ऐच्छिक पेंशन योजना आहे. या योजनेचा लाभ तुम्ही नोकरीतून निवृत्त झाल्यावर तुम्हाला मिळतो. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला इनकम टॅक्समधून सूट मिळते.

टॅक्स सेव्हिंग एफडी

अनेक बँका आपल्या ग्राहकांसाठी टॅक्स सेव्हिंग एफडी अर्थात फिक्स्ड डिपॉझिटच्या योजना उपलब्ध करून देत असतात. अशा एफडीमध्ये तुम्ही गुंतवणूक केल्यास तुम्हाला इनकम टॅक्समधून सूट मिळते.

इतर संबंधित बातम्या :

पीएनबीचा ग्राहकांना झटका, दोन महिन्यांत दुसऱ्यांदा बँक बचतीवरील व्याजदरात कपात

सलग दोन दिवस सोन्याच्या दरात घसरण, चांदीचा भाव वधारला, जाणून घ्या सोन्याचे दर

घराचं स्वप्न आवाक्याबाहेर; घर खरेदी का झाली महाग? घेऊयात जाणून