निवृत्तीनंतरचं आयुष्य सुखात घालवायचंय, मग आतापासूनच ‘या’ योजनेत महिन्याला 500 रुपये गुंतवा

| Updated on: Jul 27, 2021 | 10:55 AM

NPS | या योजनेमध्ये तुम्ही महिन्याला 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरु करु शकता. या हिशेबाने तुम्ही वर्षाला NPS मध्ये सहा हजार रुपये जमा कराल. 18 ते 70 या वयोगटातील कोणतीही व्यक्ती National Pension System योजनेत पैसे गुंतवू शकते.

निवृत्तीनंतरचं आयुष्य सुखात घालवायचंय, मग आतापासूनच या योजनेत महिन्याला 500 रुपये गुंतवा
earn money
Follow us on

नवी दिल्ली: तुम्ही आता वयाच्या चाळिशीत पोहोचला असाल तर एव्हाना तुम्ही एकदातरी निवृत्तीनंतरच्या आयुष्याविषयी विचार केला असेल. निवृत्तीनंतर आयुष्य सुखात जगायचे असेल तर पैशांचे नियोजन करण्याविषयीचे विचार तुमच्या मनात घोळत असतील. अशा लोकांसाठी राष्ट्रीय पेन्शन योजना (National Pension System) हा एक चांगला पर्याय ठरू शकेल. ही एक सरकारी योजना आहे. या योजनेमध्ये तुम्ही महिन्याला 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरु करु शकता. या हिशेबाने तुम्ही वर्षाला NPS मध्ये सहा हजार रुपये जमा कराल. 18 ते 70 या वयोगटातील कोणतीही व्यक्ती National Pension System योजनेत पैसे गुंतवू शकते.

NPS खाते कसे सुरु कराल?

NPS योजनाही ही नोकरदार, व्यवसायिक आणि फ्रीलान्सर्स अशा सर्व लोकांसाठी उपलब्ध आहे. तुम्ही घरसबसल्या ऑनलाईन पद्धतीनेही NPS खाते उघडू शकता. त्यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला निश्चित गुंतवणूक करावी लागेल.
एनपीएस पेन्शन फंड रेग्युलेटरी अँण्ड डेव्हलपमेंट ऑथोरिटी (PFRDA) कडून NPS चे नियंत्रण केले जाते. सरकारी योजना असल्यामुळे ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते.

NPS योजनेचे फायदे

पीपीएफसारख्या पारंपरिक कर बचत योजनांच्या तुलनेत NPS मध्ये जास्त रिटर्न्स मिळतात. या योजनेत 9 ते 12 टक्क्यापर्यंत व्याज मिळते. तसेच या योजनेतील पैशांवर करमाफीचाही लाभ मिळतो. आयकरातील 80CCD(1), 80CCD(1b) आणि 80CCD(2) अंतर्गत NPS योजनेत लाभ मिळतो. या योजनेत गुंतवणुक केल्यास तुम्हाला 2 लाखांपर्यंतची करमाफी मिळू शकते.

राष्ट्रीय पेन्शन योजनेत गुंतवणूक केल्यानंतर तुम्ही 60व्या वर्षानंतर 60 टक्के रक्कम काढू शकता. यावर कोणताही कर लागत नाही. तसेच गरज पडल्यास 60व्या वर्षाच्या आधीही 25 टक्के रक्कम काढू शकता. मुलांचे शिक्षण, लग्न आणि घर बांधण्यासाठी किंवा आजारपणाच्या काळात तुम्ही या पैशांचा वापर करु शकता.

इतर बातम्या:

Income Tax पोर्टलसाठी केंद्र सरकारने मोजले 165 कोटी, पण तांत्रिक अडचणींचे शुक्लकाष्ठ संपेना

Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेल एकाच किंमतीने विकणार का, पेट्रोलियम मंत्री म्हणाले…

Union Bank of Indiaच्या विशेष योजनेतून कर्ज घेणाऱ्यांसाठी चांगली संधी, क्रेडिट लाईन वाढणार