पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, 16 दिवसांत ‘हे’ काम आटपा, अन्यथा…

| Updated on: Nov 14, 2021 | 12:23 PM

Pension | निवृत्तीवेतन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने सांगितले की, पेन्शनधारक 12 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या डोअरस्टेप बँकिंग अलायन्सचा वापर करून किंवा पोस्टल विभागाच्या घरोघरी सेवा वापरून डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात.

पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, 16 दिवसांत हे काम आटपा, अन्यथा...
पेन्शन
Follow us on

नवी दिल्ली: जर तुम्ही देखील पेन्शनधारकांच्या श्रेणीत येत असाल, तर तुमच्याकडे 16 दिवस शिल्लक आहेत. पेन्शनधारकांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र (जीवन सन्मान पत्र किंवा जीवन प्रमाणपत्र) कोणत्याही अडथळ्याशिवाय पेन्शन मिळविण्यासाठी सादर करावे लागेल. पेन्शनधारक जिवंत आहे की नाही, याचा पुरावा म्हणून जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते.

जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आता तुम्हाला बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही. आता तुम्ही हे काम तुमच्या घरच्या आरामात करू शकता. तुमच्याकडे आधार कार्ड, विद्यमान मोबाइल नंबर, पेन्शन प्रकार, पीपीओ क्रमांक, पेन्शन खाते क्रमांक तुमच्यासोबत तयार असणे आवश्यक आहे, पेन्शन देणाऱ्या एजन्सी म्हणजेच बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये तुमचा आधार कार्ड क्रमांक नोंदवणे आवश्यक आहे.

लाईफ सर्टफिकिट कुठे जमा कराल?

निवृत्तीवेतन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने सांगितले की, पेन्शनधारक 12 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या डोअरस्टेप बँकिंग अलायन्सचा वापर करून किंवा पोस्टल विभागाच्या घरोघरी सेवा वापरून डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात.

डोअरस्टेप बँकिंग अलायन्स ही सार्वजनिक क्षेत्रातील 12 बँकांचा संयुकत उपक्रम आहे. या बँकांकडून ग्राहकांना घरपोच सेवा दिली जाईल. 12 बँकांमध्ये इंडियन बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB), बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, ओव्हरसीज बँक, पंजाब अँड सिंध बँक, युको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया इत्यादींचा समावेश आहे. तुम्ही संकेतस्थळ (doorstepbanks.com किंवा www.dsb.imfast.co.in/doorstep/login) किंवा डोरस्टेप बँकिंग, मोबाइल अॅप्लिकेशन किंवा टोल-फ्री नंबर (18001213721 किंवा 18001037188) वर कॉल करून सेवेचा लाभ उठवू शकता.

आपल्या जवळच्या टपाल कार्यालयातून दाखला मिळवा

इंडिया पोस्टच्या घोषणेनंतर पेन्शनभोगी पेन्शन वितरण एजन्सीऐवजी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा ज्या ठिकाणी त्याने सेवा बजावली आहे, त्या प्राधिकरणाकडे जाऊ शकते. भविष्यात पेन्शन मिळविणे सुरू ठेवण्यासाठी त्याचा हयातीचा दाखला मिळवू शकेल. ज्या निवृत्तीवेतनधारकांना पोस्ट ऑफिस किंवा पेन्शन वितरण एजन्सीकडे जाण्यास अडचण येते, ते डिजिटल हयातीचा दाखला घेण्यासाठी जवळच्या जीवन प्रमाणपत्र केंद्राला भेट देऊ शकतात.

कसा बनवाल हयातीचा दाखला

डिजिटल लाइफ सर्टिफिकेट हल्ली उमंग अॅपद्वारेदेखील बनवता येतं. यासाठी तुम्हाला मोबाईलमध्ये उमंग अॅप डाउनलोड करावा लागेल. त्यानंतर त्याच्यावर हयातीचा दाखला शोधलं असता, तुम्हाला ‘जनरेट लाइफ सर्टिफिकेट’ असा पर्याय दिसेल. तो निवडल्यानंतर पेन्शनर ऑथेंटिकेशनसाठी पेज उघडेल. यामध्ये विचारलेली माहिती भरल्यानंतर तुम्हाला डिजिटल लाईफ प्रमाणपत्र मिळू शकतं.

संबंधित बातम्या:

पेन्शनधारकांचं टेन्शन दूर, आता व्हॉट्सअ‍ॅपवर मिळणार पेन्शनशी संबंधित माहिती

Pension Alert | पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! आता घरबसल्या घेता येणार ‘या’ सुविधेचा फायदा!

पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! पैसे मिळाले नाही किंवा इतर समस्येसाठी ‘इथे’ करा तक्रार