Akshay Tritiya 2022 : अक्षय तृतीयेचा असा ‘100 वर्षातून दुर्मिळ योग’ आलाय, ‘हे ‘एक’ काम कराच

| Updated on: May 02, 2022 | 1:52 PM

ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी पंच महायोग निर्माण होतोय.

Akshay Tritiya 2022 : अक्षय तृतीयेचा असा 100 वर्षातून दुर्मिळ योग आलाय, हे एक काम कराच
अक्षय तृतीयेचा असा '100 वर्षातून दुर्मिळ योग'
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

हिंदू सणांपैकी अत्यंत महत्वाचा असलेला अक्षय तृतीया ( Akshay Tritiya) साडोतीन मुहर्तापैकी एक मुहूर्त असलेला हा सण यंदा मंगळवार, 3 मे(3 May) ला साजरा केला जाईल. यादिवशी ग्रहांचा दुर्मिळ योग आलाय. ज्यांने अक्षय तृतीयेचे महत्व अधिकच वाढवले आहे. या दरम्यान सोने,(Gold) चांदी (Silver) खरेदी करणं शुभ असेल.अक्षय तृतीया वर्षाच्या साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त. यादिवशी कोणत्याही मुहूर्ता शिवाय शुभ कार्य पार पाडू शकता. म्हणजे अख्खा दिवास शुभ मुहूर्त आहे. जसं की, लग्न, गृहप्रवेश, वास्तूशांती, मुंज इत्यादी. हिंदू पंचांगानुसार यंदा अक्षय तृतीया 3 तारखेला मंगळवारी साजरी केली जाईल. यावेळी ग्रंहाचा अद्भूत योग जुळून आला आहे. ज्याने अक्षय तृतीयेचे महत्व अधिक वाढवले आहे. या दरम्यान सोने, चांदी, नव्या वस्तूची खरेदी करणं अत्यंत शुभ आहे.

नेमका पंच महायोग काय ?

ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी पंच महायोग निर्माण होतोय. यादिवशी सूर्य मेष राशित, चंद्रमा कर्क राशित, शुक्र आणि गुरू मीन राशित आणि शनि स्वराशि कुंभ राशित असतील. अक्षय तृतीयेच्या दिवशी ग्रहांच्या स्थिती व्यतिरिक्त केदार, शुभ कर्तरी, उभयचरी, विमल आणि सुमुख नावाचे पाच राजयोग देखील आहेत. शोभन आणि मातंग योग ही यादिवशी खास आहे. ज्योतिषाशास्त्रानुसार असा दुर्मिळ योग येत्या 100 वर्षात येणार नाही.

कसा असेल शुभ योगांचा परिणाम

ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार या दुर्मिळ संयोगाचा प्रभाव खूप शुभ असणार आहे. यादिवशी सोन्य, चांदिच्या वस्तू खरेदी केल्याने तुमच्या आयुष्यात सुख – समृद्धी वाढेल. जर तुम्ही महागड्या वस्तू किंवा सोन्या चांदिचे दागिने खरेदी करू शकत नसाल तर धातू ने बनवलेली कोणतीही वस्तू तुम्ही घरी आणू शकता. यादिवशी खरेदी केलेल्या वस्तूचे तुमच्या आयुष्यावर दिर्घकाळा पर्यंत शुभ परिणाम होणार आहेत.