स्किमिंग म्हणजे काय; तुम्हालाही बसू शकतो या माध्यमातून मोठा आर्थिक फटका, फसवणूक टाळण्यासाठी काय कराल?

| Updated on: Mar 05, 2022 | 7:59 AM

भारतामध्ये सध्या डिजिटलायझेशन वाढले आहे. विशेष: कोरोना काळात तर त्यात आणखी भर पडली. आज अनेक जण लॅपटॉप किंवा स्मार्ट फोन द्वारेच बँक आणि पैशांचे सर्व व्यवहार करतात. डिजिटलायझेशनचे जसे काही फायदे आहेत तसेच काही तोटे देखील आहेत. स्मार्टफोनचा वापर वाढल्याने सायबर क्राईम देखील वाढले आहेत.

स्किमिंग म्हणजे काय; तुम्हालाही बसू शकतो या माध्यमातून मोठा आर्थिक फटका, फसवणूक टाळण्यासाठी काय कराल?
Follow us on

भारतामध्ये सध्या डिजिटलायझेशन (Digitization) वाढले आहे. विशेष: कोरोना (Corona) काळात तर त्यात आणखी भर पडली. आज अनेक जण लॅपटॉप किंवा स्मार्ट फोन (Smart phone) द्वारेच बँक आणि पैशांचे सर्व व्यवहार करतात. डिजिटलायझेशनचे जसे काही फायदे आहेत तसेच काही तोटे देखील आहेत. स्मार्टफोनचा वापर वाढल्याने सायबर क्राईम देखील वाढले आहेत. सायबर क्राईममध्ये गुन्हेगार कोणत्याही मार्गाने संबंधित व्यक्तीची बँक डिटेलस मिळवतात. त्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे तुमची आर्थिक फसवणूक होऊ शकते. अवघ्या काही मिनिटांमध्ये तुमचे बँक खाते रिकामे होते. त्यामुळे पैशांचा डिजिटल व्यवहार करताना सावध राहण्याचा इशारा तज्ज्ञांकडून दिला जातो. सायबर गुन्हेगार आर्थिक फसवणूकीसाठी वेगवेळ्या युक्त्या अमलात आणत असतात त्यातील एक प्रकार स्किमिंग हा आहे. आज आपण या प्रकाराबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

स्किमिंग म्हणजे काय?

सायबर क्राईमच्या या प्रकारात तुम्ही वापरत असलेल्या एटीएम कार्डचा उपयोग होते. तुम्ही जेव्हा एखाद्या एटीएम सेंटरमध्ये जाऊन एटीएम कार्डचा उपयोग करून पैसे काढता किंवा एखाद्या दुकानात तुमचे एटीएम कार्ड स्वॅप करता तेव्हा तुमच्या बँक खात्याशी संबंधित माहिती चोरली जाते. त्यासाठी एका विशिष्ट छोट्या यंत्राचा उपयोग होतो. हे यंत्र स्कॅनरसारखे काम करते. या यंत्राच्या माध्यमातून तुमचे एटीएम कार्ड स्कॅन होते. एटीएम कार्ड स्कॅन झाल्यानंतर संबंधित माहिती त्यामध्ये जमा होते. त्यानंतर या माहितीचा उपयोग करून ऑनलाईन फ्रॉड केला जातो. एटीएमचा पीन कॅपचर करण्यासाठी याच यंत्राला एखादा छोटासा कॅमेरा देखील लावला जाऊ शकतो. हॉटेल शॉपिंग मॉल अशा ठिकाणी अशा प्रकारे फसवणूक होण्याची शक्यता दाट असते. त्यामुळे अशा ठिकाणी सावध राहवे.

फसवणूक होऊ नये म्हणून काय काळजी घ्याल

जेव्हा तुम्ही पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये जाल तेव्हा अनोळखी माणसाची मदत घेऊ नका, एटीएम मशिनला व्यवस्थित कव्हर करूनच तुमचा एटीएमचा पीन नंबर टाका. जर तुम्हाला एटीएम मशीनच्या शेजारी किंवा मशिनमध्ये एखादे दुसरे डिव्हाईस आढळून आल्यास किंवा जर एटीएमचा किपॅड प्रॉपर काम करत नसेल तर संबंधित ठिकाणावरून ट्राजेक्शन टाळा. काळी संशयास्पद वाटल्यास त्याची माहिती पोलिसांना द्या. तुम्ही जर एखाद्या हॉटेल किंवा दुकानात तुमचे एटीएम कार्ड स्वॅप करणार असाल तर सर्व गोष्टींची आधीच खात्री करा आणि त्यानंतर तुमचे कार्ड स्वॅप करा.

संबंधित बातम्या

पुढील दोन महिने देशात खाद्यतेलाचा तुटवडा जाणवणार नाही; खाद्यतेल पुरवठा उद्योजकांचे सरकारला अश्वासन

रशिया-युक्रेन युद्धाची धग थेट किचनपर्यंत, सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका

Russia-Ukraine war : बिस्किट खरेदीपासून ते हॉटेलमधील जेवणापर्यंत सर्वच वस्तू महागणार!