अंबरनाथच्या MTPF युद्धसामुग्री बनवणाऱ्या कारखान्याला विदेशातून ऑर्डर

| Updated on: Apr 03, 2023 | 2:54 PM

VIDEO | अंबरनाथ येथे देशाच्या सैन्यासाठी युद्धसामुग्री तयार करण्याचा कारखाना, गाठलं ३१८ कोटींचं लक्ष्य

Follow us on

ठाणे : सैन्यदलांसाठी युद्धसामुग्री तयार करणाऱ्या अंबरनाथच्या मशीन टूल प्रोटोटाईप फॅक्टरीने यंदा पहिल्यांदाच ३१८ कोटींच्या उत्पादनाचं लक्ष्य गाठलं आहे. गेलात वर्षीच्या तुलनेत केलेलं जास्त उत्पादन आणि कॉर्पोरेटायझेशन झाल्यानंतर मिळालेल्या खासगी ऑर्डर्सही याच्या जोरावर एमटीपीएफ कारखान्यानं हे लक्ष्य गाठलं असून पुढील वर्षी ५०० कोटींचा टप्पा गाठण्याचं लक्ष्य कंपनीने ठेवलं आहे. याच एमटीपीएफ कारखान्यानं कॉर्पोरेटायझेशन झाल्यानंतर मागील वर्षभरात ३१८ कोटी रुपयांच्या साहित्याचं उत्पादन आणि पुरवठा केला आहे. यानिमित्त आज एमटीपीएफ कारखान्यात चीफ जनरल मॅनेजर राजेश अगरवाल यांनी सर्व कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं. यंदा दरवर्षीच्या तुलनेत दीडपट अधिक उत्पादन झालं असलं, तरी इतक्यावरच न थांबता पुढील वर्षी ५०० कोटींचा टप्पा गाठण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं यावेळी राजेश अगरवाल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. तसंच या कामगिरीसाठी सर्वच कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र केलेली मेहनत आणि अधिकारी वर्गाची प्लॅनिंग हे कारणीभूत असल्याचं त्यांनी सांगितलं.