हिंदू सणांना परवानगी देताना सरकारला लकवा का? – Ashish Shelar

| Updated on: Mar 29, 2022 | 7:26 PM

हिंदू नववर्षच्‍या निमित्‍ताने गुढीपाडव्‍याला निघणाऱ्या शोभायात्रा आणि राम नवमीच्‍या मिरवणूका यांना परवानगी द्या, अशी मागणी शेलार यांनी विधानसभेत केली होती. त्‍यावेळेपासून आजपर्यंत याबाबत सरकारकडून कोणत्‍याही स्‍पष्‍ट सूचना आल्‍या नाहीत. त्‍यामुळे आज मीडियाशी बोलताना शेलार यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली.

Follow us on

YouTube video player

मुंबई: हिंदू सणांच्या परवानगीवरून भाजपचे नेते आशिष शेलार (ashish shelar) यांनी महाविकास आघाडी (maha vikas aghadi) सरकारवर जोरदार टीका केली आहे. आघाडी सरकारने गुढीपाडव्याच्या शोभायात्रा आणि राम नवमीच्या मिरवणुकांबाबत अजूनही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे हिंदूंमध्ये (hindu) संभ्रमाचे वातावरण कायम आहे. जेव्हा जेव्हा हिंदू सणांना परवानगी देण्‍याचा विषय आला की, ठाकरे सरकारच्‍या हाताला लकवा का मारतो?, असा संतप्त सवाल आशिष शेलार यांनी केला आहे. हिंदू नववर्षच्‍या निमित्‍ताने गुढीपाडव्‍याला निघणाऱ्या शोभायात्रा आणि राम नवमीच्‍या मिरवणूका यांना परवानगी द्या, अशी मागणी शेलार यांनी विधानसभेत केली होती. त्‍यावेळेपासून आजपर्यंत याबाबत सरकारकडून कोणत्‍याही स्‍पष्‍ट सूचना आल्‍या नाहीत. त्‍यामुळे आज मीडियाशी बोलताना शेलार यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली.