Chandrashekhar Bawankule | पक्षश्रेष्ठींनी विश्वास टाकला त्यामुळे सर्वांचे आभार मानतो – बावनकुळे

| Updated on: Nov 20, 2021 | 11:22 AM

बावनकुळे म्हणाले की, पक्ष श्रेष्ठीने पुन्हा विश्वास टाकला आहे. सर्वांचे आभार मानतो. मी बाहेर होतो पण पक्षाचे काम करत होतो. माझं तिकीट कापलं तेव्हा मी नाराज नव्हतो. पक्षाचं काम करत राहिलो. आता पक्षाला वाटलं तेव्हा मला पुन्हा संधी दिली आहे. आमच्या पक्षात ओबीसी किंवा जात बघून उमेदवारी दिली जात नाही. मला तिकीट दिलं नव्हतं म्हणून भाजपला विधानसभेत फटका बसला असं म्हणता येणार नाही.

Follow us on

विधान परिषद निवडणुकीच्या 5 जागांसाठी काल भाजपनं उमेदवार यादी जाहीर केली आहे. त्यात नागपूरमधून माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बानवकुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत तिकीट कापल्यानंतर बावनकुळे नाराज असल्याच्या जोरदार चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, बावनकुळे पक्षाचा प्रत्येक कार्यक्रमात जोमाने काम करत राहिले. अनेक आंदोलनांचं नेतृत्वही बावनकुळेंनी केलं. त्यानंतर आता विधान परिषदेसाठी त्यांना संधी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना पक्षाचे आभार मानले, तसंच पुन्हा विधिमंडळात जोमाने काम करण्याचा विश्वास व्यक्त केलाय.

बावनकुळे म्हणाले की, पक्ष श्रेष्ठीने पुन्हा विश्वास टाकला आहे. सर्वांचे आभार मानतो. मी बाहेर होतो पण पक्षाचे काम करत होतो. माझं तिकीट कापलं तेव्हा मी नाराज नव्हतो. पक्षाचं काम करत राहिलो. आता पक्षाला वाटलं तेव्हा मला पुन्हा संधी दिली आहे. आमच्या पक्षात ओबीसी किंवा जात बघून उमेदवारी दिली जात नाही. मला तिकीट दिलं नव्हतं म्हणून भाजपला विधानसभेत फटका बसला असं म्हणता येणार नाही. त्याचं कारणं वेगळी आहेत. आता पुन्हा विधिमंडळात जोमाने काम करेन, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केलाय.