राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात तासभर चर्चा, गुलदस्त्यात असणारं कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं
VIDEO | एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या भेटी बदल दिलं स्पष्टीकरण, काय म्हणाले मुख्यमंत्री ?
मुंबई : एकीकडे उद्धव ठाकरे यांची मालेगावात जाहीर सभा झाली तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला सहकुटुंब शिवतीर्थ या निवासस्थानी गेल्याचे पाहायला मिळाले. या दोघांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली होती. मात्र त्यांच्या भेटीचे कारण गुलदस्त्यात होतं. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः या भेटीचं कारण स्पष्ट केले आहे. राज ठाकरे यांच्यासोबत भेट झाली. आगामी निवडणुकांबाबत चर्चा झाली नाही. ही सदिच्छा भेट होती. तर मशिदींवरील भोंगे याबाबत चर्चा झालीय. नियमांनुसार असेल ते केले जाईल. मनसे कार्यकर्त्यांवर ज्या केसेस टाकल्या आहेत त्या तपासून घेतल्या जातील. कोणावरही अन्याय करणार नाही. हे सर्वसामान्यांचे सरकार आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
Published on: Mar 26, 2023 10:05 PM
