महाराष्ट्रासाठी चिंता वाढवणारी बातमी, डेल्टा प्लस व्हेरिएंटचा महाराष्ट्रात शिरकाव, सात बाधित

| Updated on: Jun 20, 2021 | 6:57 PM

महाराष्ट्रासाठी चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण कोरोनाच्या तिसरा लाटेचा धोका ज्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे आहे त्याचा महाराष्ट्रात शिरकाव झाला आहे (delta plus variant patient found in Maharashtra)

Follow us on

महाराष्ट्रासाठी चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण कोरोनाच्या तिसरा लाटेचा धोका ज्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे आहे त्याचा महाराष्ट्रात शिरकाव झाला आहे. महाराष्ट्रात डेल्टा प्लसचे सात रुग्ण आढळले आहेत. हे सात रुग्ण रत्नागिरी, पालघर आणि नवी मुंबईत आढळले आहेत. डेल्टा प्लसचे रुग्ण आढळल्यानंतर रत्नागिरीत प्रशासनाने काही गावं सील केली आहेत. या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे महाराष्ट्रात पुढील दोन महिन्याच कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती आरोग्य तज्ज्ञांनी वर्तवली आहे. या व्हेरिएंटमुळे महाराष्ट्रात धोका कसा वाढतोय याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट ! (delta plus variant patient found in Maharashtra)