Navneet Rana यांनी कोर्टाच्या आदेशांचं उल्लंघन केलं का?-tv9

| Updated on: May 08, 2022 | 2:48 PM

राणा दाम्पत्याने जामिनावर सुटल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला, मुलाखती दिलया. रवी राणा आणि नवनीत राणा यांनी माध्यामांशी संवाद साधताना कोर्टाच्या अटी शर्थीचं उल्लघंन केलंय का याचा अभ्यास सुरू.

Follow us on

मुंबई : डिस्चार्ज नंतर नवनीत राणा यांनी माध्यमांशी संवाद साधलेला आहे. जामीन देतान राणा दाम्पत्याला माध्यमांशी संवाद साधू नये अशी अट होती. राणा दाम्पत्याने कोर्टाच्या आदेशाचं उल्लघंन केलं आहे का? याची पोलीस आणि सरकारी वकिलांच्या माध्यमातून चौकशी सुरू आहे. कोर्टच्या नियमांचं उल्लघंन झालं असल्यास राणा दाम्पत्यांचा जामिन रद्द करण्यासाठी पोलीस उद्या अर्ज करणार असल्याचं सूत्राकडून कळतंय. जामीन देताना राणा दाम्पत्याला माध्यमांशी संवाद साधू नये अशी अट होती. पण, राणा दाम्पत्याने जामिनावर सुटल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला, मुलाखती दिलया. रवी राणा आणि नवनीत राणा यांनी माध्यामांशी संवाद साधताना कोर्टाच्या अटी शर्थीचं उल्लघंन केलंय का याचा अभ्यास सुरू आहे. पोलीस आणि सरकारी वकिलांच्या मार्फेत त्यांच्या मुलाखती आणि वक्तव्य तपासली जात आहेत. त्यात काही जर अक्षेपार्ह्य वक्तव्य असल्यास किंवा कोर्टाने घातलेल्या अटी शर्थीचं उल्लघंन झालं असं आढळल्यास पोलीस सत्र न्यायालयात धाव घेणार आहेत . कोर्टाच्या नियम आणि अटी याचं उल्लंघन झालं असल्यास नवनीत राणा आणि रवी राणा यांचा जामीन रद्द करण्यासाठी पोलीस उद्या अर्ज करणार अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय.