120 आमदार असूनही उपमुख्यमंत्रीपद! मग नवं सरकार आणून भाजपला फायदा काय?- धनंजय मुंडे

| Updated on: Sep 17, 2022 | 1:37 PM

Dhananjay Munde on BJP : अजित पवारांच्या कार्यकाळात बीड जिल्ह्याला मुबलक निधी मिळाल्याचा पुनरुच्चार धनंजय मुंडे यांनी केला. अजित पवारांच्या काळात आमचं शिस्तीचं सरकार होतं, आता सरकार बेशिस्त असल्यासारखं वागतंय, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली.

Follow us on

बीड : 120 आमदार असूनही उपमुख्यमंत्रीपदावर भाजपला (Bhartiya Janata Party) समाधान मानावं लागलं, मग नवं सरकार आणून भाजपला फायदा काय झाला, अशा शब्दांत धनंजय मुंडे (Beed Dhananjay Munde) यांनी टीका केली. ते बीडमधील सभेत बोलत होते. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Opposition leader Ajit Pawar) यांच्या हजेरी घेण्यात आलेल्या या सभेत धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांचे आभारही मानले. अजित पवारांच्या कार्यकाळात बीड जिल्ह्याला मुबलक निधी मिळाल्याचा पुनरुच्चार धनंजय मुंडे यांनी केला. अजित पवारांच्या काळात आमचं शिस्तीचं सरकार होतं, आता सरकार बेशिस्त असल्यासारखं वागतंय, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली. कोरोना काळात महाविकास आघाडी सरकारने भरीव काम केल्याचंही आठवण धनंजय मुंडे यांनी करुन दिली.