संधी मिळाल्यास सोनं करेन- पंकजा मुंडे

| Updated on: Jun 03, 2022 | 2:40 PM

विधान परिषद निवडणुकीला उभं राहण्याची संधी मिळाली तर त्याचं मी सोनं करेल, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली आहे. विधानपरिषदेच्या 10 सदस्यांसाठी येत्या 20 जून रोजी निवडणूका होणार आहेत.

Follow us on

विधान परिषद निवडणुकीला उभं राहण्याची संधी मिळाली तर त्याचं मी सोनं करेल, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली आहे. विधानपरिषदेच्या 10 सदस्यांसाठी येत्या 20 जून रोजी निवडणूका होणार आहेत. याकरिता भाजपकडून पंकजा मुंडे निवडणुकीला उभ्या राहू शकतात, अशी चर्चा सुरु आहे. याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला पंकजा मुंडेंनी उत्तर दिलं. गोपीनाथ मुंडे यांच्या आठव्या स्मृतीदिनाचा कार्यक्रम बीडमधील गोपीनाथ गडावर आयोजित करण्यात आला आहे. गोपीनाथ गडावरील कार्यक्रमात मुख्य भाषणात पंकजा मुंडे याक बोलणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विधान परिषदेच्या उमेदवारीवर त्या काही भाष्य करतील का, याकडेही सर्वांच्या नजरा आहेत. गोपीनाथ गडावर या कार्यक्रमासाठी हजारो कार्यकर्ते बसतील, अशी आसन व्यवस्था करण्यात आली आहे.