Rajya Sabha Election: प्रस्ताव मान्य न केल्यास ही निवडणूक होणार आणि आम्ही जिंकणार- चंद्रकांत पाटील

| Updated on: Jun 03, 2022 | 1:29 PM

आमच्या पक्षश्रेष्ठीनेही आमचीच भूमिका योग्य असल्याचं सांगितली. यू गो विथ दॅट स्टँड असं पक्षश्रेष्ठींनी सांगितलं आहे. त्यामुळे आम्ही निवडणूक लढवणारच आहोत. आघाडीने आमचा प्रस्ताव मान्य केला नाही तर ही निवडणूक होणारच, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.

Follow us on

राज्यसभेच्या निवडणुकीत आम्ही राज्यसभेची निवडणूक लढणार असल्याचं आघाडीच्या नेत्यांना स्पष्ट केलं. राज्यसभेला आम्हाला पाठिंबा द्यावा, विधान परिषदेला आम्ही पाठिंबा देऊ, असा प्रस्ताव आघाडीने आम्हाला दिला होता. पण आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत. आम्हाला राज्यसभा महत्त्वाची आहे. त्यामुळे आम्ही त्यांना उलटा प्रस्ताव दिला. तुम्हीच आम्हाला राज्यसभेला पाठिंबा द्या. आम्ही तुम्हाला विधान परिषदेत पाठिंबा देऊ, असं आघाडीच्या नेत्यांना सांगितलं. आम्ही आमचा उमेदवार मागे घेणार नाही. या संदर्भात आमचं केंद्राशी बोलणं झालं आहे. आमच्या पक्षश्रेष्ठीनेही आमचीच भूमिका योग्य असल्याचं सांगितली. यू गो विथ दॅट स्टँड असं पक्षश्रेष्ठींनी सांगितलं आहे. त्यामुळे आम्ही निवडणूक लढवणारच आहोत. आघाडीने आमचा प्रस्ताव मान्य केला नाही तर ही निवडणूक होणारच, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.