Kirit Somaiya | हिंमत असेल तर मला अडवून दाखवा : किरीट सोमय्या

| Updated on: Sep 27, 2021 | 4:14 PM

किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा एकदा आव्हान दिलंय. आता शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनाच मी नोटीस दिली की हिम्मत असेल तर मला रोखून दाखवा, अशा शब्दात सोमय्या यांनी पवार आणि ठाकरेंना एकप्रकारे चॅलेंज केलं आहे.

Follow us on

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या आज पुन्हा एकदा कोल्हापूर दौऱ्यावर निघाले आहेत. त्यापूर्वी त्यांना मुंबईतील सिद्धीविनायक मंदिराच्या बाहेरुनच सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. त्यावेळी किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा एकदा आव्हान दिलंय. आता शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनाच मी नोटीस दिली की हिम्मत असेल तर मला रोखून दाखवा, अशा शब्दात सोमय्या यांनी पवार आणि ठाकरेंना एकप्रकारे चॅलेंज केलं आहे.

सिद्धीविनायकाचं दर्शन घेऊन मी कोल्हापुरला अंबेमातेच्या दर्शनासाठी जात आहे. कोल्हापुरात अंबाबाईला प्रार्थना करणार की, तू शक्तीची माता आहे. तू पापाच्या राक्षसाचा वध केला होता. अंबेमातेच्या चरणी प्रार्थना करणार की भ्रष्टाचाररुपी राक्षस जो महाराष्ट्रात फोफावला आहे, त्याचा वध करण्याची शक्ती आम्हाला दे. त्यावेळी पत्रकारांनी सोमय्यांना प्रश्न विचारला की तुम्हाला मागच्या वेळी पोलिसांनी कुठली नोटीस दिली आहे का? त्यावर सोमय्या म्हणाले की आता मी त्यांना नोटीस दिली आहे. मी शरद पवारांना नोटीस दिली, मी उद्धव ठाकरेंना नोटीस दिली. मी कोल्हापूरच्या पोलीस आयुक्तांना सांगितंल, कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्याला सांगितलं की, तुमच्यात हिम्मत असेल तर मला थांबवून दाखवा. आम्ही जाणार, अंबाबाईचं दर्शन घेणार आणि त्या भ्रष्टाचाररुपी राक्षसाचा वध करणार, असा इशाराही सोमय्या यांनी यावेळी दिलाय.