बोगस रासायनिक खतांमुळे द्राक्षाचे लाखोंचे नुकसान

| Updated on: Mar 16, 2022 | 9:55 AM

घडलेल्या प्रकारबाबत शेतकऱ्यांने कृषी आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. कृषी विभागाने तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यानंतर रासायनिक खते दुकानदाराचा परवाना रद्द करण्यात आला आहे.

Follow us on

माढा – द्राक्षाच्या बागेसाठी वापरण्यात आलेल्या रासायनिक खतांमुळे द्राक्षांचे घड जळाले. माढा तालुक्यातील घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये (Farmer) घबराहट पसरली आहे. बावी (bavi) गावात ही घटना घडली असून 35 टनाचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. 3 हजार हेक्टर हुन अधिक क्षेत्रावर द्राक्ष बागेची लागवडीचे नुकसान झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. बोगस रासायनिक खतांमुळे द्राक्षांचे लाखोंचे झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. विजय ज्ञानदेव मोरे (vijay more) या शेतकऱ्याच्या शेतातील द्राक्ष बागेत हा प्रकार घडला आहे. घडलेल्या प्रकारबाबत शेतकऱ्यांने कृषी आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. कृषी विभागाने तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यानंतर रासायनिक खते दुकानदाराचा परवाना रद्द करण्यात आला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण

द्राक्षाच्या बागेसाठी वापरण्यात आलेल्या रासायनिक खतांमुळे द्राक्ष घड जळून गेल्याचा धक्कादायक प्रकार माढा तालु्क्यातील बावी गावात घडला आहे. या प्रकारामुळे माढा तालुक्यातील द्राक्ष बागायतदार शेतकरी धास्तावले आहेत.3 हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर द्राक्ष बागेच्या लागवडची नुकसान झाल्याचीा माहिती कृषी विभागाने दिली आहे. विजय ज्ञानदेव मोरे या शेतकऱ्याच्या शेतातील द्राक्ष बागेत हा प्रकार उघडकीस आला आहे. शेतकरी विजय मोरे यांनी कृषी आयुक्ताकडे हायटेक “ग्रीन अॅग्रो टेक” या कंपनीच्या विरोधात खताच्या दुकानदाराच्या विरोधात खते घेतलेल्या पावतीसह रीतसर तक्रार तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेऊन जिल्हा कृषी विभागाच्या पथकातील तज्ज्ञांनी लॅबमध्ये तपासणी केली. त्यावेळी पथकाला अनेक गोष्टी आढळून आल्याने संबंधित दुकानदाराचा परवाना रद्द करण्यात आला आहे.