Inflation : पुण्यात राष्ट्रवादीचं महागाईविरोधात आंदोलन, भाजपविरोधात घोषणाबाजी

| Updated on: May 11, 2022 | 11:20 AM

रोजच वाढणाऱ्या इंधनाच्या दरामुळे जगायचे कसे, हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. केंद्र सरकारला मात्र याचे काहीच देणेघेणे नाही. नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासही त्यांना कोणताही रस नाही.

Follow us on

पुणे : वाढलेल्या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक झाली असून पुण्यात पक्षातर्फे (Pune NCP Agitationआंदोलन करण्यात येत आहे. यावेळी कमळाबाईची तसेच महागाईची देवी अशी आरती करण्यात आली. भ्रष्टाचाराचा धिक्कार असो अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. देशात पेट्रोल-डिझेल दरवाढ (Petrol diesel price hike) सुरूच आहे. तर गॅस सिलिंडरच्या किंमतीतही सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. रोजच वाढणाऱ्या इंधनाच्या दरामुळे जगायचे कसे, हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. केंद्र सरकारला मात्र याचे काहीच देणेघेणे नाही. नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासही त्यांना कोणताही रस नाही. तर दुसरीकडे देशात फारशी महागाई (Inflation) नसल्याचे वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले होते. अशी वक्तव्ये म्हणजे सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार आहे. या सर्वांचा निषेध म्हणून शनिपार चौकात हे आंदोलन करण्यात आले.