Pune| मावळमध्ये आरती समाप्तीच्या महाप्रसादातून विषबाधा, चार जणांची प्रकृती गंभीर

Pune| मावळमध्ये आरती समाप्तीच्या महाप्रसादातून विषबाधा, चार जणांची प्रकृती गंभीर

| Edited By: | Updated on: Nov 20, 2021 | 12:26 AM

मावळ तालुक्यातील भडवली गावात काकडा आरती समाप्तीच्या काल्याच्या महाप्रसाद कार्यक्रमात 28 जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली. त्यामध्ये 4 लहान मुलांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार काकडा आरतीच्या समाप्तीला भडवली गावामध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. 

पुणे : मावळ तालुक्यातील भडवली गावात काकडा आरती समाप्तीच्या काल्याच्या महाप्रसाद कार्यक्रमात 28 जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली. त्यामध्ये 4 लहान मुलांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार काकडा आरतीच्या समाप्तीला भडवली गावामध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी काहींना उलट्या, मळमळ, पोटदुखी, चक्कर येणे अशा प्रकारचा त्रास येथील नागरिकांना सुरु झाला. त्यानंतर बाधित रुग्णांना जवळच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यामध्ये 4 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.