पुणे महापालिकेने Kirit Somaiya यांच्या सत्काराला परवानगी नाकारली

| Updated on: Feb 11, 2022 | 4:06 PM

महापालिका आवारात सोमय्या यांच्या सत्काराला पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation)परवानगी नाकारली आहे. परवानगी नसली तरी भाजप नेते किरीट सोमय्या ( Kirit Somaiya)यांचा सत्कार करणारच असल्याची आक्रमक भूमिका पुणे शहर भाजपने (BJP) घेतली आहे. गेल्या आठवड्यात पुणे महानगरपालिकेच्या इमारतीत किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की झाली होती.

Follow us on

महापालिका आवारात सोमय्या यांच्या सत्काराला पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation)परवानगी नाकारली आहे. परवानगी नसली तरी भाजप नेते किरीट सोमय्या ( Kirit Somaiya)यांचा सत्कार करणारच असल्याची आक्रमक भूमिका पुणे शहर भाजपने (BJP) घेतली आहे. गेल्या आठवड्यात पुणे महानगरपालिकेच्या इमारतीत किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की झाली होती. यावरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी काही शिवसैनिकांना अटक केली आहे. मात्र आज दुपारी किरीट सोमय्या यांना पुणे महानगरपालिकेच्या ज्या पायऱ्यावर रोखण्यात आलं होतं त्याच पायऱ्यावर आज त्यांचा पुणे शहर भाजपच्या वतीने सत्कार केला जाणार होता. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यावर कारवाई होणारच आज जो पोलीस बंदोबस्त होता,त्यादिवशी मात्र सर्व पळून गेले होते. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना हिशोब द्यावा लागेल. उद्धव ठाकरेंनी मला मारण्यासाठी 100 गुंड पाठवले होते. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यावर कारवाई होणारच पवार आणि ठाकरे यांनी पैसे खाल्लेत संजय राऊतांनी जे पैसे खर्च केलेत. त्याचा हिशोब तर द्यावा लागेल, त्यांचा आणि पाटकर यांचा संबध काय ते त्यांनी जाहीर करावं. असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.