Special Report | Russia शी पंगा घेणारं युक्रेनी भूत viral -Tv9

| Updated on: Mar 02, 2022 | 9:37 PM

एक ‘भूत’ खूप चर्चेत आहे. लोक त्याला ‘घोस्ट ऑफ कीव’ म्हणत आहेत. वास्तविक हे भूत दुसरे तिसरे कोणी नसून युक्रेनचे MiG-29 Fulcrum फायटर पायलट आहे.

Follow us on

मुंबई : युक्रेन एक छोटासा देश असून मोठ्या शत्रुशी निर्भिडपणे लढतोय. अजूनही रशियाला युक्रेनला नमवण्यात यश आलेले नाही. त्याला कारण ठरलंय युक्रेनकधील जबरदस्त हत्यारं. युक्रेनकडे काही खास मिसाईल आहे. काही खास फाईटर जेट आहेत, ज्यामुळे त्यांनी रशियाला घायाळ केलंय. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सलग पाचव्या दिवशीही सुरूच आहे. दोन्ही देश एकमेकांचे सैनिक मारल्याचा दावा करत आहेत. यादरम्यान एक ‘भूत’ खूप चर्चेत आहे. लोक त्याला ‘घोस्ट ऑफ कीव’ म्हणत आहेत. वास्तविक हे भूत दुसरे तिसरे कोणी नसून युक्रेनचे MiG-29 Fulcrum फायटर पायलट आहे. ज्यांना लोक देशाचा हिरो म्हणत आहेत. युद्ध सुरू झाल्यापासून, हा पायलट रशियन सैनिकांसाठी कर्नकाळ ठरला आहे. आतापर्यंत त्यांनी सहा लढाऊ विमाने पाडली आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, युक्रेनचा एकटा पायलट कीवच्या आकाशात उड्डाण करत आहे आणि रशियाला सतत घायाळ करत आहे. या युद्धाच्या वातावरणात अशा अनेक गोष्टी घडत आहेत ज्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. अशा स्थितीत या ‘कीवचे भूत’सध्या चांगलेच व्हायरल होत आहे. पण सोशल मीडियावर लोक पायलटचा फोटो आणि व्हिडिओ शेअर करून त्याचे खूप कौतुक करत आहेत. यामध्ये सर्वसामान्यांव्यतिरिक्त पत्रकारांचाही सहभाग आहे.