Special Report | पुतीन म्हणतात, मी ठरवणार युक्रेनी राष्ट्राध्यक्ष -Tv9

| Updated on: Mar 02, 2022 | 10:00 PM

वोलेदिमीर झेलेन्स्की हे यूरोपियन देशांच्या बाजूनं झुकलेले आहेत. त्यामुळं एकेकाळी देश सोडून पळून जाणाऱ्या यानुकोव्हिच यांना रशियाला युक्रेनचं अध्यक्ष बनवायचं आहे.

Follow us on

नवी दिल्ली : रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्धासंबंधी आणखी एक घडामोड समोर येत आहे. रशियाकडून युक्रेनवर लष्करी आक्रमण करण्यात आल्यापासून पहिल्यांदा युक्रेनियन सैन्याला सत्ता स्थापित करण्याचं आवाहन करण्यात आलं. नाटो सदस्य देशात यूक्रेननं सहभागी होऊ नये ही भूमिका रशियाची होती. तर, दुसरी भूमिका ही यूक्रेनचे सध्याचे राष्ट्रपती व्लादिमीर झेलेन्स्की यांना त्यांच्या पदावरुन पायउतार करण्यात यावं ही आहे. या दोन भूमिका घेऊन रशिया युक्रेनवर हल्ले करत आहे. वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्या जागी यानुकोव्हिच यांना राष्ट्रपती करावं, अशी भूमिका रशियाची असल्याचं समोर आलं आहे. यानुकोव्हिच हे यापूर्वी युक्रेनचे अध्यक्ष होते. यानुकोव्हिच हे रशियाधार्जिणे आहेत. तर, वोलेदिमीर झेलेन्स्की हे यूरोपियन देशांच्या बाजूनं झुकलेले आहेत. त्यामुळं एकेकाळी देश सोडून पळून जाणाऱ्या यानुकोव्हिच यांना रशियाला युक्रेनचं अध्यक्ष बनवायचं आहे.