मी पळपुटा नाही, ईडीवर माझा विश्वास- संजय राऊत

मी पळपुटा नाही, ईडीवर माझा विश्वास- संजय राऊत

| Edited By: | Updated on: Jul 01, 2022 | 12:25 PM

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी त्यांची ईडीकडून चौकशी करण्यात येणार आहे. दोन दिवसांपूर्वीच ईडीने त्यांना समन्स बजावले होते. मात्र राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ईडीकडे वेळ मागितला होता.

“ईडीवर माझा विश्वास आहे. मी अत्यंत बेडरपणे, माझा काहीच गुन्हा नसल्यामुळे चौकशीला सामोरं जातोय. चौकशीला सामोरं जाण्याची हिंमत माझ्यामध्ये आहे. या देशाचा नागरिक म्हणून माझं हे कर्तव्य आहे की मी चौकशीला सामोरं जावं. मी पळपुटा नाही”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी त्यांची ईडीकडून चौकशी करण्यात येणार आहे. दोन दिवसांपूर्वीच ईडीने त्यांना समन्स बजावले होते. मात्र राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ईडीकडे वेळ मागितला होता. मात्र गुरुवारी एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज राऊत ईडीसमोर चौकशीला हजर राहिले आहेत. मला बजावलेल्या समन्सचा मी आदर करतो, तपास यंत्रणांना सहकार्य करणं हे माझं कर्तव्य आहे, असं ट्विट त्यांनी केलं.