आजची सकाळ मला शेतकऱ्यांच्या दृष्टीने स्वातंत्र्याची पहाट वाटते : संजय राऊत

आजची सकाळ मला शेतकऱ्यांच्या दृष्टीने स्वातंत्र्याची पहाट वाटते : संजय राऊत

| Edited By: | Updated on: Nov 20, 2021 | 12:05 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर कृषी कायदे रद्द केले आहेत. शेतकऱ्यांच्या संघर्षापुढे सरकारला झुकावं लागलं. शेतकऱ्यांसाठी हा खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन आहे.

नाशिक: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर कृषी कायदे रद्द केले आहेत. शेतकऱ्यांच्या संघर्षापुढे सरकारला झुकावं लागलं. शेतकऱ्यांसाठी हा खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन आहे. शेतकऱ्यांनी हे स्वातंत्र्य लढून मिळवलं आहे. भिकेत मिळालं नाही, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप आणि अभिनेत्री कंगना रणावतला लगावला.