Sambhaji Brigade | संभाजी ब्रिगेडमध्ये आल्यानंतर संभाजीराजेंना मुख्यमंत्री करु – शिवानंद भानूसे

| Updated on: Jul 03, 2021 | 10:56 AM

संभाजी छत्रपती यांना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर त्यांनी भाजपमधून बाहेर पडून संभाजी ब्रिगेडमध्ये सहभागी व्हावं. आम्ही संभाजी छत्रपती यांना मुख्यमंत्री करायला तयार आहोत, असं प्रत्युत्तर संभाजी ब्रिगेडने संभाजी छत्रपती यांना दिलं आहे. | Shivanand Bhanuse Of Sambhaji Brigade Said if Sambhajiraje Chatrapati leave BJP Then We Will ready to make him CM

Follow us on

संभाजी छत्रपती यांना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर त्यांनी भाजपमधून बाहेर पडून संभाजी ब्रिगेडमध्ये सहभागी व्हावं. आम्ही संभाजी छत्रपती यांना मुख्यमंत्री करायला तयार आहोत, असं प्रत्युत्तर संभाजी ब्रिगेडने संभाजी छत्रपती यांना दिलं आहे. शुक्रवारी बीड इथे झालेल्या कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारला असता ‘मला मुख्यमंत्री करा मग प्रश्न विचारा’ असं संभाजी छत्रपती म्हणाले होते. छत्रपतींच्या या वक्तव्याला संभाजी ब्रिगेडने प्रत्युत्तर दिलं आहे. “बीडच्या कार्यक्रमात आमच्या एका कार्यकर्त्याच्या प्रश्नाला उत्तर देताना संभाजी छत्रपती यांनी मला मुख्यमंत्री करा आणि मग प्रश्न विचारा, असं म्हटलं. मला त्यांना सांगायचंय, की तुम्ही पहिल्यांदा भाजपमधून बाहेर पडा आणि संभाजी ब्रिगेडमध्ये प्रवेश करा, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करायला तयार आहोत”, असं प्रत्युत्तर संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते शिवानंद भानुसे यांनी छत्रपती संभाजी यांना दिलं.| Shivanand Bhanuse Of Sambhaji Brigade Said if Sambhajiraje Chatrapati leave BJP Then We Will ready to make him CM