संजय राऊत यांनी सांगितले, महाविकास आघाडीचा शत्रू कोण?

| Updated on: Feb 04, 2023 | 12:09 PM

पुण्यातील कसबा ,पिंपरी चिंचवड पोट निवडणुकांमध्ये मविआ एकत्रित लढणार, काय म्हणाले संजय राऊत?

Follow us on

मुंबई : पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड पोट निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्रित लढणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. ते म्हणाले, ‘ विधान परिषदेच्या पाच निवडणुका झाल्या. तिथेही आम्ही आमचा उमेदवार दिला होता. पण मविआ असल्याने शिवसेनेने वारंवार त्यागाची भूमिका ठेवली आहे. आपल्यामुळे महाविकास आघाडीचं नुकसान होऊ नये, असा उद्देश आहे. सगळ्यांचा राजकीय शत्रू एकच आहे. पाच पैकी चार जागा मविआकडे आहे तर एक जागा भाजपने जिंकली आहे. अमरावती आणि नागपूरात दोन महत्त्वाच्या जागा मविआने जिंकल्या. त्यामुळे विधान परिषदेत आम्ही आमच्यातील एकीमुळे विजय मिळवला, असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा महाविकास आघाडी एकत्रित लढणार आहे. चिंचवडच्या जागेसाठी शिवसेनेचा आग्रह आहे. तरीही मविआ म्हणून आम्ही एकत्रितपणे निर्णय घेऊ. या दोन्ही ठिकाणी जिंकण्याची संधी जास्त कुणाला आहे, यावरून ठरवलं आहे. आमच्यात मतभेद, रस्सीखेच नाही. मविआ जिंकणं हेच ध्येय आहे, असं राऊत यांनी ठामपणे सांगितले आहे.