सिद्धू मूसेवालाच्या हत्येचं पुणे कनेक्शन; दोन शूटर्स पुण्यातील असल्याची माहिती

सिद्धू मूसेवालाच्या हत्येचं पुणे कनेक्शन; दोन शूटर्स पुण्यातील असल्याची माहिती

| Edited By: | Updated on: Jun 06, 2022 | 1:57 PM

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याला गोळ्या मारणाऱ्या शार्प शूटर्सची ओळख पटली आहे. या शूटर्सचे फोटो हाती लागले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे दोन शूटर्स हे महाराष्ट्रातील पुणे शहरातील आहेत.

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याला गोळ्या मारणाऱ्या शार्प शूटर्सची ओळख पटली आहे. या शूटर्सचे फोटो हाती लागले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे दोन शूटर्स हे महाराष्ट्रातील पुणे शहरातील आहेत. संतोष जाधव आणि सौरव महाकाळ अशी या आरोपींची नावे आहेत. दोघेही आरोपी पुण्यातील रहिवासी आहेत. मुसेवालाची हत्या करण्यासाठी एकूण चार राज्यातून शूटर्स पंजाबमध्ये पाठवण्यात आले होते. 3 शूटर्स पंजाबमधील होते, 2 महाराष्ट्रातले, 2 हरयाणातले आणि यामधील एक शूटर्स हा राजस्थानमधील होता. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची 29 मे रोजी भरदिवसा हत्या करण्यात आली आहे. त्याच्यावर मनसा येथील जवाहरके गावात गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात मुसेवाला याचा जागीच मृत्यू झाला आहे.