CM Uddhav Thackeray at Chipi | कोकणाच्या मातीत बाभळीची झाडं; उद्धव ठाकरेंचा राणेंवर ‘प्रहार’?

| Updated on: Oct 09, 2021 | 3:10 PM

चिपी विमानतळाच्या उद्घाटन समारंभात शुक्रवारी अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात अपेक्षेप्रमाणे राजकीय जुगलबंदी रंगताना पाहायला मिळाली.

Follow us on

चिपी विमानतळाच्या उद्घाटन समारंभात शुक्रवारी अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात अपेक्षेप्रमाणे राजकीय जुगलबंदी रंगताना पाहायला मिळाली. या कार्यक्रमात नारायण राणे यांनी सर्वांदेखत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला अनेक मुद्द्यांवरुन लक्ष्य केले. मात्र, त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाच्या पहिल्याच वाक्यापासून नारायण राणे यांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले. चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा आजचा क्षण हा आदळआपट करण्याचा नाही, आनंद व्यक्त करण्याचा आहे. कोकणाच्या मातीत बाभळी आणि आंब्याची दोन्ही झाडं उगवतात. त्यामध्ये मातीचा दोष नसतो. त्यामुळे कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. नारायण राणे यांनी व्यासपीठावरून हाणलेल्या जवळपास प्रत्येक टोल्याला उद्धव ठाकरे यांनी प्रतिटोला लगावला. काही लोक पाठांतर करुन बोलतात, पण अनुभवाने बोलणं वेगळं असतं. मनातील मळमळ बोलून दाखवणे हे तर त्यापेक्षाही वेगळं असतं. आज या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेते एकत्र आले आहेत. इतका चांगला क्षण असताना त्याला गालबोट लागू नये म्हणून एक काळं तीट असावं लागतं, तशीच काही लोकं आज याठिकाणी आहेत, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.