UP | उत्तर प्रदेशात मदरशांचं अनुदान बंद, मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय

| Updated on: May 18, 2022 | 10:55 AM

काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेश सरकारने मोठा निर्णय घेतला. राज्यातील मदरसे आणि शाळांमध्ये राष्ट्रगीत गान अनिवार्य करण्यात आले आहे.

Follow us on

लखनौः मदरशांमधील सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना राष्ट्रगीत (National Anthem) गायनाची सक्ती केल्यानंतर उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Aditya nath) यांनी आता आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशातील नव्या मदरशांना यापुढे सरकारचं अनुदान  मिळणार नाही. मंगळवारी या निर्णयावर राज्य सरकारनं शिक्कामोर्तब केलं. योगी सरकारने मागील कार्यकाळातही मदरशांना अनुदान दिलं नव्हतं. आता तर कॅबिनेटच्या बैठकीत (Cabinet Meeting) सदर प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. एवढंच नाही तर नव्यानं अस्तित्तात आलेल्या मदराशांनी याविरोधात कोर्टात धाव घेतली तरीही त्यांना दिलासा मिळणार नाही, अशी तरतूदही योगी सरकारने केली आहे. योगी सरकारच्या आधी समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादव यांच्या सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या परस्पर विरोधी निर्णय योगी सरकारनं घेतला आहे. त्यामुळे राजकीय दृष्ट्याही उत्तर प्रदेशसाठी हा मोठा निर्णय आहे.