‘महाराष्ट्र केसरी’तून एकाच तालमीतल्या तीन पैलवानांची माघार

जालना : महाराष्ट्र केसरीच्या इतिहासात प्रथमच एकाच तालमीतल्या तीन पैलवानांनी माघार घेतली आहे. पंचांकडून अन्याय झाल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र केसरीचे दावेदार पोपट घोडके, हर्षल सदगीर आणि अतुल पाटील यांनी स्पर्धेवर बहिष्कार टाकला. माती विभागात उपांत्य फेरीत जालन्याच्या विलास डोईफोडे विरुद्ध पोपट घोडकेची झुंज होती. सकाळी याच कुस्तीमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. अन्याय झाल्याने पोपट तीन […]

'महाराष्ट्र केसरी'तून एकाच तालमीतल्या तीन पैलवानांची माघार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:48 PM

जालना : महाराष्ट्र केसरीच्या इतिहासात प्रथमच एकाच तालमीतल्या तीन पैलवानांनी माघार घेतली आहे. पंचांकडून अन्याय झाल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र केसरीचे दावेदार पोपट घोडके, हर्षल सदगीर आणि अतुल पाटील यांनी स्पर्धेवर बहिष्कार टाकला.

माती विभागात उपांत्य फेरीत जालन्याच्या विलास डोईफोडे विरुद्ध पोपट घोडकेची झुंज होती. सकाळी याच कुस्तीमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. अन्याय झाल्याने पोपट तीन कुस्त्या जिंकूनही मैदानात हजर न झाल्याने जालन्याच्या विलास डोईफोडेला विजयी घोषित करण्यात आलंय.

जालन्यातील आझाद मैदानावर सुरू असलेल्या कुस्ती स्पर्धेवर गतवेळचा महाराष्ट्र केसरी काका पवार तालमीने बहिष्कार घातलाय. त्यामुळे काका पवार यांनी जालना शहर सोडलं असून ते पुण्याकडे रवाना झाले आहेत.

शनिवारी दुपारी 12 वाजताच्या दरम्यान कुस्तीचे सामने सुरु असलेल्या आझाद मैदानावर काका पवार आणि आयोजक यांच्यात चांगलाच वाद पाहायला मिळाला. कुस्तीपटू अभिजित कटके आणि गणेश जगताप यांच्यात कुस्तीचा सामना सुरु असताना पंचाने वेळ होण्याआधीच व्हीसल वाजवल्याने काका पवार आणि आयोजक यांच्यात वाद झाला.

या वादादरम्यान आयोजक डॉ. दयानंद भक्त आणि आत्माराम भक्त यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप काका पवारांनी केला. हा वाद चांगलाच चिघळल्याने काकासाहेब पवार यांनी सर्वच खेळाडूंसह मैदानाबाहेर ठिय्या दिला. या प्रकारानंतर काका पवार यांनी स्पर्धेवर बहिष्कार टाकत शहर सोडलं.

Non Stop LIVE Update
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट.
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी.
देशात आज नवीन पुतीन तयार होतोय, शरद पवारांची मोदींवर अप्रत्यक्ष टीका
देशात आज नवीन पुतीन तयार होतोय, शरद पवारांची मोदींवर अप्रत्यक्ष टीका.