गारपिटीने शेतपिकाचं मोठं नुकसान; पण, द्राक्ष उत्पादकाने अशी वाचवली दोन एकर द्राक्षबाग

| Updated on: Mar 21, 2023 | 1:02 PM

वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीने फळबागांचे मोठे नुकसान झाले. केळी पाठोपाठ कलिंगड खरबुजांच्या बागा या अस्मानी संकटात उद्ध्वस्त झाल्या आहेत.

गारपिटीने शेतपिकाचं मोठं नुकसान; पण, द्राक्ष उत्पादकाने अशी वाचवली दोन एकर द्राक्षबाग
Follow us on

सोलापूर : राज्यात गेल्या चार दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस पडतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीने फळबागांचे मोठे नुकसान झाले. केळी पाठोपाठ कलिंगड खरबुजांच्या बागा या अस्मानी संकटात उद्ध्वस्त झाल्या आहेत. गारांचा मार लागल्याने कलिंगडासह खरबुजांची फळे खराब झालीत. त्यामुळे या फळांना बाजारात आधीपेक्षा निम्माच भाव मिळतोय. या आर्थिक संकटाने फळबागा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले. उत्पादनाचा खर्चही निघणे अवघड झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितलं. त्यातच अद्याप पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करायला बांधावर सरकारचा कुणीही कर्मचारी फिरकलेला नाही. मात्र, सोलापुरातील एका द्राक्ष उत्पादकाने दोन एकर द्राक्षबाग वाचवली.

एक हजार साड्यांचा वापर

त्यासाठी त्याने साड्यांचा वापर केला. जिथं जिथं द्राक्षे आहेत, तिथं त्याने साडी बांधली. हे काम काही सोपं नव्हतं. त्याच्याकडे दोन एकर जागेत द्राक्ष आहेत. शंभर-दोनशे नव्हे तर एक हजार साड्यांचा वापर त्यासाठी त्याने केला. एक हजार साड्यांसाठी त्याला एक लाखापेक्षा जास्त खर्च आला. पण, द्राक्षबाग वाचल्याने आता तो पैसा निघणार असल्याचं द्राक्ष उत्पादकाचं म्हणणं आहे.

हे सुद्धा वाचा

उन्हापासून द्राक्षे सुरक्षित

सोलापूरच्या माढ्यातील शेतकऱ्याने हा प्रयोग केला. उन्हापासून संरक्षणासाठी दोन एकर द्राक्ष बागेला वाचवलं. एक हजार साड्यांचा वापर केला. माढ्यातील बाळासाहेब नाईकनवरे या शेतकऱ्याने ही किमया केली. दोन एकर द्राक्ष बागेची हानी होऊ नये म्हणून एक हजार साड्यांचा वापर केला. त्याच्या या प्रयोगामुळे द्राक्ष बाग सुरक्षित ठेवले.

एकीकडे राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला. पण, बाळासाहेब नाईकनवरे यांनी या द्राक्षबागेच्या संरक्षणासाठी साड्यांचा वापर केला. उन्हामुळे ही बाग वाचली. शिवाय वादळ, वाऱ्याचा आणि गारपिटीचाही द्राक्ष्यांवर परिणाम झाला नाही.

अशी ही डोकॅलिटी

डोकं लढवलं तर उपाय निघतात. बाळासाहेब यांनी डोकं लढवलं. पिक घ्यायचं असेल तर त्यातून काहीतरी उपाय काढावा लागले. नुसत रडत बसण्यात काही अर्थ नाही. योग्य उपाययोजना केल्यास नुकसान कमी होऊ शकते. यावर इतर शेतकऱ्यांनीही उपाय करण्याची गरज आहे.