शेतीमाल तारण योजनेचा शेतकऱ्यांना आधार, यंदा प्रथमच 37 कोटींचे कर्जाचे वितरण

| Updated on: Feb 07, 2022 | 4:00 AM

शेतकऱ्यांच्या शेतीमालावर कर्ज ही शेतीमाल तारण योजना जुनी असली तरी खऱ्या अर्थाने योजनेची अंमलबजावणी यावर्षी झाली आहे. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे. राज्य कृषी पणन मंडळाच्या शेतमाल तारण योजनेमध्ये शेतीमालाच्या काढणी हंगाम ऑक्टोबर 2021 पासून आतापर्यंत 70 बाजार समित्यांनी सहभाग घेत 37 कोटी रुपयांचे कर्ज वितरण केले आहे.

शेतीमाल तारण योजनेचा शेतकऱ्यांना आधार, यंदा प्रथमच 37 कोटींचे कर्जाचे वितरण
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

पुणे : शेतकऱ्यांच्या शेतीमालावर कर्ज ही (Agricultural Mortgage Scheme) शेतीमाल तारण योजना जुनी असली तरी खऱ्या अर्थाने योजनेची अंमलबजावणी यावर्षी झाली आहे. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे. राज्य कृषी पणन मंडळाच्या शेतमाल तारण योजनेमध्ये शेतीमालाच्या काढणी हंगाम ऑक्टोबर 2021 पासून आतापर्यंत 70 बाजार समित्यांनी सहभाग घेत 37 कोटी रुपयांचे कर्ज वितरण केले आहे. त्यामुळे ऐन गरजेच्या दरम्यान शेतकऱ्यांना ही (Loan) कर्ज रक्कम मिळाली असून योजनेचा उद्देशही साध्य झाला आहे. (Kharif Season) खरीप हंगामाच्या दरम्यान, या शेतीमाल तारण योजनेअंतर्गत दीड लाख क्विंटल शेतीमाल तारण ठेवण्यात आला होता. सध्या तारण केलेला माल शेतकऱ्यांनी विक्री केला आहे. त्याअनुशंगाने या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किती लाभ झाला याचा लेखाजोखा पणन मंडळाच्यावतीने मांडण्यात आला आहे.

वेळप्रसंगीच पणन मंडळाकडून पैसे

शेतीमाल तारण योजनेच्या दरम्यान शेतकऱ्यांना त्या संबंधित बाजार समित्याच शेतकऱ्यांना पैसे देत होत्या. याचा संपूर्णच भार पणन मंडळावरही पडला नाही. ज्या बाजार समित्या स्वनिधीतून तारण कर्ज योजना राबवितात त्यांना त्यांनी वाटप केलेल्या तारण कर्ज रक्कमेवर 5 टक्के व्याज सवलत अनुदान स्वरूपात देण्यात येते. जर एखादी बाजार समिती निधीअभावी ही योजना राबविण्यास असमर्थ असेल तर पणन मंडळाकडून अशा बाजार समित्यांना 5 लाख रुपये दिले जात असल्याची माहिती पणन मंडळाने स्पष्ट केले आहे.

असे आहे योजनेचे स्वरुप

शिवाय बाजार समित्यांच्या उत्पादनामध्ये वाढ झाली आहे. या योजनेअंतर्गत बाजार समिती अथवा वखार महामंडळाच्या गोदामात ठेवलेल्या शेतीमालाच्या एकूण किमतीच्या 75 टक्क्यांपर्यंतची रक्कम 6 महिने कालावधीसाठी 6 टक्के व्याजदराने तारण कर्ज स्वरूपात बाजार समितीमार्फत त्वरित उपलब्ध करून देण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांचा शेतीमाल सुरक्षित तर राहिला असल्याने दरात सुधारणा झाल्यावर शेतकऱ्यांना तो विकताही आला आहे. त्यामुळे योजनेचा उद्देश आणि गरजेच्या दरम्यान शेतकऱ्यांना योग्य वेळी ती मदत शेतकऱ्यांना मिळाली आहे.

यंदा कशामुळे गरज निर्माण झाली?

शेतीमाल तारण योजना ही गेल्या अनेक वर्षापासून राबवली जाते. पण यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीमालावर परिणाम झाला होता. विशेषत: सोयाबीनचा दर्जा ढासळला होता. शिवाय बाजारात दरही घसरले होते. त्यामुळे सोयाबीन तारण ठेऊन शेतकऱ्यांना 75 टक्के रक्कम वापरता आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना योजनेचे महत्व पटले असून आता दरवर्षी योजनेच्या माध्यमातून मोठी उलाढाल होईल असा विश्वास पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या :

बीडच्या शेतकऱ्याचा नादच खुळा : पठ्ठ्याने तीन वर्ष परीश्रम केले पण पाणी टंचाईवर कायमचा तोडगाच काढला

Soybean: हंगाम अंतिम टप्प्यात, तरीही शेतकऱ्यांच्या काय आहेत अपेक्षा?

नगदी पिकांना कोरोनाचा फटका, व्यापाऱ्यांनी पाठ फिरवल्याने कलिंगड वावरातच