वखार महामंडळाचा अनोखा उपक्रम, शेतीमालाला मिळणार योग्य दर

| Updated on: Oct 24, 2021 | 4:50 PM

शेतीमाल साठवणूकीसाठी वखार महामंडाळाने तशी सोय केली आहे. शेतीमाल तारण कर्ज या माध्यमातून शेतीमालाची साठवणूक करता येते शिवाय कर्जही मिळते. मात्र, याबाबत जनजागृती नसल्याने वखार महामंडाळाने एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. या सर्व योजनांची माहीती देण्यासाठी वखार आपल्या दारी हे अभियान राबवले जाणार आहे.

वखार महामंडळाचा अनोखा उपक्रम, शेतीमालाला मिळणार योग्य दर
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

लातूर : शेतकऱ्यांचा माल शेतात (Fair rate for agricultural goods) आहे तोपर्यंतच त्याच्या मालकीचा राहतो. एकदा का त्याची काढणी मळणी झाली की त्याचे दर ठरवण्याचा अधिकार हा व्यापाऱ्यांकडे येतो. शिवाय दर नसतानाही साठवणूकीचा प्रश्न असल्याने शेतकरी शेतातूनच थेट बाजारात मालाची विक्री करतो. योग्य दर होण्याची वाट न पाहता कवडीमोल दरात मालाची विक्री होते. शेतीमाल साठवणूकीसाठी वखार महामंडाळाने तशी सोय केली आहे. शेतीमाल तारण कर्ज या माध्यमातून शेतीमालाची साठवणूक करता येते शिवाय कर्जही मिळते. (Warehousing Corporation ) मात्र, याबाबत जनजागृती नसल्याने वखार महामंडाळाने एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. या सर्व योजनांची माहीती देण्यासाठी वखार आपल्या दारी हे अभियान राबवले जाणार आहे. 15 जिल्ह्यात हे अभियान राबवले जाणार असून सोमवारपासून उस्मानाबाद येथून या अभियानाला सुरवात होणार आहे.

शेतकरी परीश्रम आणि तंत्रज्ञानाचा वापर करुन भरघोस उत्पादन घेतात. मात्र, त्यांच्या मालाला योग्य दर मिळत नाही. सध्या सोयाबीनची मळणी अंतिम टप्प्यात आहे. बाजारात सोयाबीनला दर नसतानाही कवडीमोल दरात विक्री करावी लागत आहे. याच मालाची साठवणूक केली आणि योग्य दर आल्यास त्याची विक्री केली तर शेतकऱ्यांच्या फायद्याची राहणार आहे. परंतु, साठवणुकीसाठी जागा नसल्याचे कारण सांगत शेतकरी हे मालाची विक्री करतात. पण वखार महामंडळाने शेतीमाल साठवणूकीची सोय केली असून त्याची माहिती शेतकऱ्यांरपर्यंत पोहचावी म्हणूनच आता 15 जिल्ह्यांमध्ये ही कार्यशाळा घेण्यात येणार आहे.

सोमवारपासून (25 ऑक्टोंबर ) कार्यशाळेला सुरवात

उस्मानाबाद येथून या वखार महामंडळाच्या कार्यशाळेला सुरवात होणार आहे तर मंगळवारी ही कार्यशाळा लातूर येथे पार पडणार आहे. त्यानंतर नांदेड, परभणी, वाशीम, खामगाव (बुलढाणा), अकोला, दर्यापूर (अमरावती), यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, अर्जुनी मोरगाव (गोंदिया), तुमसर (भंडारा) या ठिकाणी ही कार्यशाळा पार पडणार आहे.

कार्यशाळेत काय होणार मार्गदर्शन?

सध्या खरीपातील सोयाबीन, उडीद या पिकांची काढणी कामे अंतिम टप्प्यात आहेत. कमी दर असल्याने या पिकाची विक्री न करता वखार महामंडळाकडे साठवणूक केल्यास त्याचा कसा फायदा होणार आहे याची माहिती सांगितली जाणार आहे. शिवाय शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता असल्यास शेतीमाल तारण योजनेचीही माहिती यावेळी दिली जाणार आहे. शेतीमालाची विक्री कधी करावी, राज्य वखार महामंडाळाची शेतीमाल साठवणूक योजना, लहान साठवणूक केंद्र या योजनांची देखील माहिती दिली जाणार आहे.

शेतीमालावर मिळते कर्ज

1.शेतमाल प्रकार : सुर्यफूल, सोयाबीन, तुर, उडिद, भात , करडई, मुग, हळद, चना या मालाकरिता बाजारभावातील एकूण किमतीच्या 75 टक्के रक्कम ही कर्ज म्हणून शेतकऱ्यांना दिली जाते. परतफेडीची मुदत ही सहा महिन्याची असून याकरीता 6 टक्के व्याजदर आहे.

2. शेतमाल प्रकार : मका,ज्वारी, गहू, बाजरी या मालाकरिता बाजारभावातील एकूण किमतीच्या 50 टक्के रक्कम ही कर्ज म्हणून शेतकऱ्यांना दिली जाते. परतफेडीची मुदत ही सहा महिन्याची असून याकरीता 6 टक्के व्याजदर आहे.

3. शेतमाल प्रकार : काजू बी या मालाकरिता बाजारभावातील एकूण किमतीच्या 75 टक्के रक्कम ही कर्ज म्हणून शेतकऱ्यांना दिली जाते. परतफेडीची मुदत ही सहा महिन्याची असून याकरीता 6 टक्के व्याजदर आहे.

4. शेतमाल प्रकार : बेदाणा या मालाकरिता बाजारभावातील एकूण किमतीच्या 50 टक्के रक्कम ही कर्ज म्हणून दिली जाते. परतफेडीची मुदत ही सहा महिन्याची असून याकरीता 6 टक्के व्याजदर आहे. (Awareness campaign of Warehousing Corporation for fair rates of agricultural goods )

संबंधित बातम्या :

असं नेमकं काय घडतं ? काळ्या म्हशीला पांढरं रेडकू होतं

यंदा कापसाचे दर तेजीतच, शेतकऱ्यांना काय आहे कृषी विद्यापीठाचा सल्ला?

यंदा कापसाचे दर तेजीतच, शेतकऱ्यांना काय आहे कृषी विद्यापीठाचा सल्ला?