असं नेमकं काय घडतं ? काळ्या म्हशीला पांढरं रेडकू होतं

आतापर्यंत म्हशीच्या रेडकाच्या अंगावर कुठेही पांढरा डाग असला तरी चर्चेचा विषय होत होता. पण आश्चर्य म्हणजे एका म्हशीला पांढरच रेडकू जन्माला आले आहे. आहो खरंच..पाटण तालुक्यातील रवले पाटीलवाडी येथे म्हशीने चक्क पांढऱ्या रेडकाला जन्म दिला आहे. त्यामुळे बघ्यांची तर गर्दी होत आहे.

असं नेमकं काय घडतं ? काळ्या म्हशीला पांढरं रेडकू होतं
सातारा जिल्ह्यातील रेवले पाटीलवाडी येथे म्हशीने पांढऱ्या रंगाच्या रेडकाला जन्म दिला आहे.

सातारा : आतापर्यंत म्हशीच्या रेडकाच्या अंगावर कुठेही पांढरा डाग असला तरी चर्चेचा विषय होत होता. पण आश्चर्य म्हणजे एका म्हशीला पांढरच रेडकू जन्माला आले आहे. आहो खरंच..पाटण तालुक्यातील रवले पाटीलवाडी येथे म्हशीने चक्क पांढऱ्या रेडकाला जन्म दिला आहे. त्यामुळे बघ्यांची तर गर्दी होत आहे. पण हे नेमके घडले कसे याबाबतची चर्चा अधिक रंगू लागली आहे. हे म्हशीचे रेडकू असले तरी हुबेहुब गाईच्या वासरासारखे दिसत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

काळ्या रंगाचे किंवा डोक्यावर एखादं-दुसरा पांढरा ठिपका असणारे म्हशीचे रेडकू आपल्यापैकी अनेकांच्या पाहण्यात आहे. मात्र, गाईच्या वासराप्रमाणेच अगदी पांढरे शुभ्र रेडकाला म्हशीने जन्म दिला आहे. तालुक्यातील ढेबेवाडी भागातील वाल्मिक पठरावरील पाटीलवाडी येथे सचिन लक्ष्मण साळुंखे यांची शेती आहे. त्यांच्या म्हशीने अशा प्रकारे रेडकाला जन्म दिल्याने परिसरातील नागरिकांना हा अजब प्रकार पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. मात्र, याचे नेमके कारण काय हे कुणालाच माहिती नव्हते. जो तो आता पर्यंत रेडकाच्या अंगावर एखादा पांढरा डाग असल्याचे पाहिले होते पण संपूर्ण रेडकूच पांढरे पाहण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगत होता.

नेमंके काय घडल्याने अंस होतं

म्हशीला पांढऱ्या रंगाचे रेडकू जन्माला आले याचे काय कारण? याबाबत पशुवैद्यकीय अधिकारी डॅा. शैलेश केंडे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, हा जेनेटीक बदलाचा प्रकार आहे. जसं कधी सहा बोटं असणारे बाळ जन्माला येते. त्वचेचा रंग हा मेलॅनिन नावाच्या पिंग्मेनमुळे काळा असतो. यामध्ये पिंग्मेनशनमध्ये जेनेटीक बदलाचा हा परिणाम आहे. मेलॅनिन पिंग्मेनशनचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने अशा प्रकारे पांढरे रेडकू हे जन्माला येऊ शकते. शिवाय गर्भामध्ये बदल झाल्यावर अशा घटना घडतात. मात्र, याचा परिणाम त्या रेडकावर होणार नाही. नियमितपणेच त्याची वाढही होईल पण असे प्रकार हे दुर्मिळ असल्याचेही डॅा. केंडे यांनी टी.व्ही 9 शी माहिती देताना सांगितले आहे.

पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने केला खुलासा

म्हशीला पांढरे रंगाचे रेडकू अशा घटना दुर्मिळच घडतात. हा गुणसुत्रातील एकत्रीकरणामुळे घडलेला प्रकार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, नेमके कारण त्यांनाही उमजले नाही. त्यामुळे हा केवळ चर्चेचा विषय राहिला होता. पांढऱ्या रंगाचे रेडकू जन्माला आले असले तरी विकृत नाही. त्याला कोणत्याही प्रकारची व्याधी नव्हती. त्यामुळे इतर रेडकाप्रमाणेच तेही जन्मले की आपली क्रीया हे करीत होते. (Amazing events in Satara, white redku to buffalo)

संबंधित बातम्या :

यंदा कापसाचे दर तेजीतच, शेतकऱ्यांना काय आहे कृषी विद्यापीठाचा सल्ला?

मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुखद धक्का, नाही भासणार खतांचा तुटवडा

बैलाच्या खांद्यावरील सुज वेदनादायी अन् कामावर परिणाम करणारी, काय आहेत उपाय?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI