AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20i World Cup 2026 : बुधवारी 3 सामन्यांचा थरार, दक्षिण आफ्रिका सलग दुसरा विजय मिळवणार?

Icc T20i World Cup 2026 February 11 Matches Schedule : चॅम्पियन ऑस्ट्रेलिया आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 मोहिमेतील आपला पहिला सामना हा बुधवारी आयर्लंड विरुद्ध खेळणार आहे. जाणून घ्या इतर 4 संघांसमोर कुणाचं आव्हान असणार आहे.

T20i World Cup 2026 : बुधवारी 3 सामन्यांचा थरार, दक्षिण आफ्रिका सलग दुसरा विजय मिळवणार?
South Africa Cricket TeamImage Credit source: ProteasMenCSA X Account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Feb 11, 2026 | 2:19 AM
Share

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत 10 फेब्रुवारीपर्यंत एकूण 12 सामन्यांचं यशस्वीरित्या आयोजन करण्यात आलं आहे. भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, इंग्लंड या आणि इतर प्रमुख संघांनी विजयी सुरुवात केली आहे. तर इतर नवख्या संघांनी टफ फाईट देत आपण फक्त खेळायला नाही आलोत हे दाखवून दिलंय. या स्पर्धेत पहिले 13 दिवस दररोज साखळी फेरीत प्रत्येकी 3-3 सामने होणार आहेत. या निमित्ताने 11 फेब्रुवारीला कोणते 6 संघ मैदानात असणार आहेत? तसेच कोणत्या संघासमोर कुणाचं आव्हान असणार? हे जाणून घेऊयात.

बुधवारी क्रिकेटच्या मैदानात दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया विरुद्ध आयर्लंड आणि इंग्लंड-वेस्ट इंडिज सामने होणार आहेत. पहिल्या आणि तिसऱ्या सामन्याचं आयोजन हे भारतात करण्यात आलंय. तर दुसरा सामना हा श्रीलंकेत खेळवण्यात येणार आहे.

दक्षिण आफ्रिका-अफगाणिस्तान

दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान या दोघांचा हा या स्पर्धेतील दुसरा सामना असणार आहे. दक्षिण आफ्रिकेने मोहिमेतील पहिल्या सामन्यात कॅनडावर मात केली होती. तर अफगाणिस्तानला आपल्या सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडकडून 5 विकेट्सने पराभूत व्हावं लागलं होतं. अशात अफगाणिस्तानला सुपर 8 मधील आव्हान कायम ठेवायचं असेल तर कोणत्याही स्थितीत विजय मिळवावा लागेल. या सामन्याला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सकाळी 11 वाजता सुरुवात होणार आहे.

ऑस्ट्रेलिया-आयर्लंड भिडणार

ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप मोहिमेतील आपला पहिला सामन्यात आयर्लंड विरुद्ध भिडणार आहे. तर आयर्लंडचा हा दुसरा सामना असणार आहे. आयर्डंला पहिल्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध पराभूत व्हावं लागलेलं. त्यामुळे आयर्लंडचा ऑस्ट्रेलियासमोर चांगलाच कस लागणार आहे. उभयसंघातील हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहे. सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे.

इंग्लंड-विंडीजमध्ये टफ फाईट

इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात बुधवारी तिसरा आणि अंतिम सामना होणार आहे. हा सामना वानखेडे स्टेडियममध्ये संध्याकाळी 7 पासून सुरु होणार आहे. दोन्ही संघांनी स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. तसेच इंग्लंडने दुसऱ्या सामन्यासाठी 24 तासांआधीच प्लेइंग ईलेव्हन जाहीर केलंय. इंग्लंडने यासह आपण दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज असल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे इंग्लंड सलग दुसरा विजय मिळवणार की वेस्ट इंडिज वानखेडेत मैदान मारण्यात यशस्वी ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात