AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुर्या प्रकल्पाच्या पाण्यावरुन महायुतीत ठिणग्या, मीरा-भाईंदरला पाणी मी आणलं, मंत्री प्रताप सरनाईक यांचे आमदार मेहतांना खडेबोल

मीराभाईंदर येथे सुर्या प्रकल्पाच्या श्रेयवादातून महायुतीतच खडाजंगी झाली आहे. या प्रकल्पाच्या पाण्याच्या एक थेंबही ठाण्यास मिळणार नाही या मेहता यांच्या वक्तव्याचा मंत्री सरनाईक यांनी समाचार घेतला आहे.

सुर्या प्रकल्पाच्या पाण्यावरुन महायुतीत ठिणग्या, मीरा-भाईंदरला पाणी मी आणलं, मंत्री प्रताप सरनाईक यांचे आमदार मेहतांना खडेबोल
prakash mehta and pratap sarnaik
| Updated on: Nov 19, 2026 | 11:52 PM
Share

मीराभाईंदर येथे महायुतीत पुन्हा मंत्री प्रताप सरनाईक आणि भाजपाचे आमदार नरेंद्र महेता यांच्या वाकयुद्ध सुरु झाले आहे.आता सुर्या प्रकल्पाच्या पाण्याच्या श्रेयवादावरुन दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. नरेंद्र मेहता यांचा सुर्या प्रकल्पाच्या २१८ एमएलडी पाण्याशी कवडीचाही संबंध नाही प्रताप सरनाईक होता म्हणूनच हा प्रकल्प पूर्णत्वास गेला असे आव्हान मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहे.

मंत्री प्रताप सरनाईक यांनी या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की नरेंद्र मेहताचा सूर्या प्रकल्पाच्या २१८ एमएलडी पाण्याशी कवडीचाही संबंध नाही. प्रताप सरनाईक होता म्हणूनच हा प्रकल्प पूर्णत्वास गेला. अजगरासारखे शहर गिळण्याचा प्रयत्न करू नका,” सरनाईकांचा मेहता आणि महापौर डिंपल मेहतांवर जोरदार पलटवार; जनतेची फसवणूक आणि दिशाभूल करत असल्याचा आरोप. त्याच बरोबर मीरा-भाईंदरला पाणी मी आणलं, तुम्ही फक्त पत्रकार परिषद घेऊन जनतेचं मनोरंजन केलं.

जे काही शिल्लक राहिले आहे, तेही गिळण्याचा प्रयत्न सुरू

सरनाईक पुढे म्हणाले की आमदार नरेंद्र मेहता यांनी एक थेंबही पाणी ठाण्याला जाऊ देणार नाही, अशा घोषणा करून पत्रकार परिषदेतून जनतेचे मनोरंजन केले आहे. भविष्यात चौकाचौकांत आणि इमारतींच्या आवारात असेच मनोरंजनाचे कार्यक्रम त्यांना करावे लागतील, असा खोचक टोलाही सरनाईक यांनी यावेळी लगावला आहे. प्रताप सरनाईक होता म्हणूनच हा पाणीप्रकल्प मंजूर झाला आणि पूर्णत्वास जाऊ शकला, असा दावा सरनाईक यांनी केला आहे. आता जे काही शिल्लक राहिले आहे, तेही गिळण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशा शब्दांत सरनाईक यांनी नरेंद्र मेहता यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Follow Us
दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत आणखी 6 तालुक्यांची भर; कोणत्या....
Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत आणखी 6 तालुक्यांची भर; कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यांचा समावेश? व्हिडिओ बघाच 
दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील घराच्या तोडक कारवाईला हायकोर्टाची स्थगिती..
Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील जुन्या घराच्या तोडक कारवाईला हायकोर्टाची स्थगिती; पुढील सुनावणी कधी?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरुन मनोज जरागेंचा नवा दावा काय?
Manoj Jarange : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरुन मनोज जरागेंचा नवा दावा काय?
भाजप आमदार महेश बालदींना तीन वर्षांची कारावासाची शिक्षा; निकालानंतर...
Mahesh BaldI : भाजप आमदार महेश बालदींना तीन वर्षांची कारावासाची शिक्षा; मात्र निकालानंतर...
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय काय?
Maharashtra Drought : आधी पाणी, मग सुशोभीकरण; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
शिंदे सेनेला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये प्रवेश! त्या बड्या नेत्याच्या पक्ष..
Shivsena : BJP : शिंदे सेनेला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये प्रवेश! त्या बड्या नेत्याच्या पक्षबदलाने पालघरच्या राजकारणात खळबळ
शिंदेंचा प्रवासाचा प्लॅन बदलला; रस्तेमार्गे पुण्याकडे रवाना....
Eknath Shinde : हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, शिंदेंचा प्रवासाचा प्लॅन बदलला; पंढरपुरातून रस्तेमार्गे पुण्याकडे रवाना
शायना एन.सी. यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं आंदोलन...
Pune : बाळासाहेबांचा अवमान सहन करणार नाही...; शायना एन.सी. यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं आंदोलन
शिवसेना पक्ष, चिन्हासंदर्भात आजची सुनावणी संपली; पुढील सुनावणी कधी?
Shivsena Supreme Court Hearing : शिवसेना पक्ष, चिन्हासंदर्भात आजची सुनावणी संपली; पुढील सुनावणी कधी?
13 वर्षांची प्रतीक्षा संपली; GTA 6 लॉन्च होताच गेमिंग विश्वात धुमाकूळ
GTA 6 Launch : तब्बल 13 वर्षांची प्रतीक्षा संपली; GTA 6 लॉन्च होताच गेमिंग विश्वात धुमाकूळ